मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) नॅशनल क्रश म्हणून ओळखलं जातं. दाक्षिणात्य अभिनेत्री असणारी रश्मिका 'पुष्पा' चित्रपटानंतर आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप तरी तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही. मात्र सोशल मीडियासह सगळीकडे तिची चर्चा सुरु असते.
नुकतीच ती Lakme Fashion Week मध्ये सहभागी झाली होती. पण सध्या रश्मिका मराठीमध्ये एन्ट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण यावेळी श्रीवली कोणत्याही सिनेमात दिसणार नाही तर ती परफॉर्मन्स सादर करणार आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा 'झी चित्र गौरव' 2023 नुकताच पार पडला आहे. हा सोहळा २६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर तुम्हाला पाहता येणार आहे. या सोहळ्याचे वेध सध्या कलाकारांसह प्रेक्षकांनाही लागले आहेत. यंदाच्या सोहळ्यात खूप काही खास असणार आहे, विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरही या मंचावर आपला डान्स सादर करणार आहेत. याशिवाय विनोदाची आतिषबाजी हा तर या सोहळ्याचा मुख्य भाग असतोच. एवढंच नव्हेतर जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवन गैरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली 'रश्मिका मंदान्ना'. जी आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल.
तेव्हा रश्मिकाचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.