"वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी...", व्हर्जिनीटी विषयी रणवीर सिंगचा खळबळजनक खुलासा

"१२ व्या वर्षीच मी...", खासगी आयुष्याबद्दल रणबीर सिंगचं मोठं वक्तव्य; ऐकून तुम्हालाही भसेल धक्का

Updated: Jul 21, 2022, 10:36 AM IST
"वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी...", व्हर्जिनीटी विषयी रणवीर सिंगचा खळबळजनक खुलासा title=

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रणवीर हा त्याच्या भन्नाट फॅशनमुळे चर्चेत असतो. पण एका मुलाखतीत रणवीरने त्याच्या व्हर्जिनीटी विषयी एक धक्कादायक खुलासा केला होता. 

रणवीरला ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने एक खुलासा केला. "१२ वर्षांचा असताना मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते", असं रणवीर म्हणाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे रणवीर म्हणाला, ”मी प्रत्येक गोष्ट खूप कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मी शाळेत असताना माझ्या मित्रांचे आईवडील मला म्हणायचे की, तू आमच्या मुलांना बिघडवत आहेस. माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी यात खूप एक्स्पर्ट झालो असं मला वाटू लागलं होतं.” 

रणवीरचा 'जयेश भाई जोरदार' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याशिवाय रणवीर ‘सर्कस’, ‘सिम्बा 2’, ‘तख्त’, ‘अन्नियन बॉलिवूड रीमेक’ या चित्रपटात दिसणार आहे.