Shah Rukh Khan Jawan New Song: किंग खान शाहरुखचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित 'जवान' (Jawan) हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट झालाय. शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आात शाहरुखच्या चाहत्यांना पठाणची उत्सुकता आहे. चित्रपटातील 'Not Ramaiya Vastavaiya' हे गाणं आज सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. अवघ्या काही मिनिटात या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. शाहरुख खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) काल 'नॉट रमैया वस्तावैया' गाण्याचा टीझर शेअर केला होता.
बुर्ज खलीफावर दाखवणार Jawan चा ट्रेलर
शाहरुख खानचा जवान चित्रपटाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रदर्शनाच्या सहा दिवस आधी म्हणजे 1 सप्टेंबरला शाहरुख खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला जाणार आहे. प्रदर्शनाचा भव्य दिव्य सोहळा दुबईतल्या अल हब्तूर शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जाणार आहे. याच कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला जाणार असल्याची शक्यता आहे. पण कार्यक्रमाबद्दल अदयाप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शाहरुख खानचा जवान हा चित्रपट एटली कुमारने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात शाहरुख खानशिवाय नयनतारा ही प्रमुख अभिनेत्री आहे. याशिवाय विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, प्रियामणी यांनीही भूमिका साकारली आहे. जवाननंतर शाहरुख खान डंकी या चित्रटात दिसणार आहे. राजकुमार हिरानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
रमैया वस्तावैयाचा अर्थ काय?
चित्रपटात किंवा गाण्यात असे काही शब्द असतात जे ऐकायला आणि उच्चारायलाही मजेदार वाटतात. पण त्या शब्दांचा अर्थच आपल्याला माहित असतो. शाहरुखच्या जवान चित्रपटाली 'रमैय्या वस्तावैया' हा शब्द ऐकायला आणि उच्चारायला छान वाटतो. पण या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय?
ज्येष्ठ अभिनेते राजकपूर आणि अभिनेत्री नर्गिस यांचा 'श्री 420' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील 'रमैया वस्तावैया' हे गाणंही तितकंच हिट ठरलं. हे गाणं आपण हजारवेळा ऐकलं असेल. इतकंच काय तर आजही हे गाणं तितकंच लोकांच्या तोडीं आहे. याच नावाचा 2013 मध्ये एक हिंदी चित्रपटही आला. यात गिरीश कुमार, सोनू सूद आणि श्रुती हसन यांची प्रमुख भूमिका होती. आता जवान चित्रपटातील गाण्यामुळे 'Ramaiya Vastavaiya' हा शब्द पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या तोंडी आला आहे.
मुळात 'रमैया वस्तावैया' हा एक तेलुगू शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे रामा तू कधी येणार? राम+अइय्या या शब्दाचा वापर पुरुषांबद्दल प्रेम आणि सन्मान व्यक्त करताना केला जातो. तर वस्तावैया म्हणज तू कधी येणार असा होता. राम+अइय्या+वस्तावैया = राम तू कधी येणार.