'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार

Pushpa 2: एक मोठी बातमी समोर येत आहे, थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित काही लोकांची तब्येत अचानक बिघडू लागली. अचानक शो थांबवून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 6, 2024, 11:06 AM IST
'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार title=

Pushpa 2 Film Screening Mumbai: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' जगभरातील चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंगसह जबरदस्त कमाई केली. दरम्यान, मुंबईतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईत चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अचानक चित्रपटगृहात उपस्थित लोकांची तब्येत बिघडू लागली.

यामुळे स्क्रीनिंग मध्येच थांबवावे लागले. वृत्तानुसार, ही घटना मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये घडली. जिथे 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिरचीचा स्प्रे वापरला होता. त्यामुळे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांची तब्बेत अचानक बिघडू लागला. प्रेक्षकांना घशाला जळजळ, खोकला आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे शो 20 मिनिटांसाठी थांबवावा लागला. मध्यंतरानंतर अचानक एका व्यक्तीने स्प्रे फवारल्याने गर्दीत एकच खळबळ उडाली, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

थिएटरमध्ये बिघडू लागली लोकांची तब्बेत 

त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'पुष्पा 2' संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे, परंतु त्याच्याशी काही वादही जोडले गेले आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी हैदराबादमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा 9 वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.

'पुष्पा 2' सिनेमामुळे गोंधळ

या घटनेचे कारण म्हणजे साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता थिएटरबाहेर पोहोचला, त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि चेंगराचेंगरी झाली. महिलेच्या मृत्यूनंतर अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यापूर्वी एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना 'आर्मी' म्हटले होते, ज्यावर श्रीनिवास गौर नावाच्या व्यक्तीने आक्षेप घेत अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याने अभिनेत्याला त्याच्या चाहत्यांसाठी 'आर्मी' हा शब्द वापरू नये असे सांगितले.