Nora Fatehi ला मिळाला नवरदेव, लवकरच अडकणार का लग्न बंधनात?

नोराचा डान्स आणि तिच्या मुव्हस नेहमीच चर्चेत असतात, परंतु आता नोरा चर्चेत आहे, ते एका वेगळ्याच कारणामुळे.

Updated: Feb 14, 2022, 06:19 PM IST
Nora Fatehi ला मिळाला नवरदेव, लवकरच अडकणार का लग्न बंधनात? title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्स नोरा फतेहीला आजच्या काळात कोण ओळखत नाही. आपल्या डान्स आणि अदांनी सर्वांना वेड लावणाऱ्या नोराची सर्वत्र चर्चा सुरू असते. सोशल मीडियापासून ते मित्र-मैत्रीणींमध्ये देखील लोक नोराबद्दल चर्चा सुरू असते. नोरा सोशल मीडियावरती नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती तेथे आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो व्हिडीओ अपलोड करत असते. जे तिचे चाहाते आनंदाने पाहातात आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करतात. एवढेच काय तर सोशल मीडियावर नोराचा फॅन क्लब देखील आहे. जे नोराचे व्हिडीओ किंवा फोटो त्यांच्या ग्रुपवरती शेअर करत असतात.

नोराचा डान्स आणि तिच्या मुव्हस नेहमीच चर्चेत असतात, परंतु आता नोरा चर्चेत आहे, ते एका वेगळ्याच कारणामुळे.

सध्या नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे, असे बोलले जात आहे की, नोरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे आणि तिने तिचा नवरदेव देखील निश्चित केला आहे. तिने पोस्ट करत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली.

स्वत: नोराने आपल्याला नवरदेव मिळाला हे मान्य केल्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

 नोरा फतेहीने तिच्या लग्नाबद्दल काय म्हटले आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नोरा फतेहीबद्दल बोलायचे तर ती त्या बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत खूप लवकर आपले नाव कमावले आहे. नोरा फतेहीच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे, त्यामुळेच आजच्या काळात तिला सर्वजण खूप पसंत करतात.

तिने आपल्या सोशल मीडियावर सांगितले की मला माझा वर सापडला आहे आणि मी मी त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त नोरा फतेहीचीच चर्चा होत आहे. 

पण आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की व्यक्ती नक्की आहे तरी कोण? नोरा फतेही कोणाशी लग्न करणार आहे? हा बॉलिवू़डमधील कोणी अभिनेता आहे की एखादा बिझनेस मॅन? परंतु तसे नाही.

एका मुलाने इंस्टाग्रामवरती रील बनवला, त्याने हा रील पोस्ट करताना लिहिले की, त्याला या दिलबर-दिलबर मुलीशी म्हणजे नोराशी लग्न करायचे आहे. तेव्हा हा रील्स नोराने हाच रील स्वत:च्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि गंमतीने म्हटले की, ती या मुलाशी लग्न करणार आहे. त्यामुळे नोरा फतेहीच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत.