Varsha Usgaonkar : मालिका का सोडली? बिग बॉससाठी नाही तर वर्षा उसगांवकरने दिलं 'हे' कारण?

ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकरने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून निरोप घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Jul 25, 2024, 08:22 PM IST
Varsha Usgaonkar : मालिका का सोडली?  बिग बॉससाठी नाही तर वर्षा उसगांवकरने दिलं 'हे' कारण? title=

Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar : नुकतेच अभिनेत्री वर्षा उसगांवकरने काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून निरोप घेत असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर वर्षा उसगांवकर ही बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, आता स्वत: अभिनेत्रीने या चर्चांवर भाष्य केलं आहे. 

दोन वर्षांनी बिग बॉस मराठी रिएल्टी शोचा पाचवा सीझन सुरु होणार आहे.   28 जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील खूप वाढली आहे. मात्र, यंदाच्या या सीझनमध्ये कोण-कोणते स्पर्धक असणार याबाबतही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

मालिका का सोडली? 

ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकरने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून निरोप घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, मालिका का सोडली? यावर वर्षा उसगांवकरने थेट उत्तर दिलं आहे.

मालिकेत साकारत असलेल्या व्यक्तीरेखेला पुढे वाव नसल्याचे मला आणि निर्मात्यांना माहित होते. त्यामुळे मी मलिका सोडण्याचा निर्णय घेतला. मी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचे पुढं काहीच होऊ शकत नाही म्हणून मी मालिकेतून निरोप घेतला असं वर्षा उसगांवकरने सांगितले. 

बिग बॉस मराठीमध्ये जाणार की नाही? 

मलिका सोडल्यानंतर वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच अभिनेत्रीने मी बिग बॉसच्या घरात जाणार नाही असं म्हटलं आहे. ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आली हे माहिती नाही. बिग बॉस मराठीमध्ये जाण्याची ही अफवा असल्याचं वर्षा उसगांवकरने म्हटलं आहे. 

रितेश भाऊचा अनोखा अंदाज

बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. या सीझनमध्ये अभिनेता रितेश देशमुखचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची खूप उत्सुकता आहे. गेल्या अनेक  वर्षांपासून हा शो मी पाहत आलो आहे. मला बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून कलर्स मराठीसोबत जोलडे गेल्याचा आनंद आहे. असं रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल बोलताना म्हटलं आहे.