कतरिना कैफने अक्षय कुमार लगावलीली कानशीलात; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या कूल स्टाइलसाठी ओळखली जाते

Updated: Aug 5, 2022, 10:07 PM IST
कतरिना कैफने अक्षय कुमार लगावलीली कानशीलात; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का title=

मुंबई :  हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या कूल स्टाइलसाठी ओळखली जाते. नुकतंच कतरिनाला तो सीन आठवला,  जेव्हा तिला तिचा स्टार अभिनेता अक्षय कुमारला कानाखाली मारायची होती. सूर्यवंशी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कतरिनाला अक्कीसोबत हे काम करायचं होतं. ज्यावर कतरिना कैफने तिचा अनुभव शेअर केला आहे.

कतरिनाने अक्षयला का वाजवली कानशीलात?
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला थप्पड मारली. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीला तो क्षण आठवून या बद्दल सांगितलं. 'सूर्यवंशी' टेलिव्हिजनवर प्रीमियरसाठी सज्ज आहे. या सीनबद्दल बोलताना कतरिना म्हणाली, "रोहित शेट्टीच्या चित्रपटासाठी शूटिंग करणं हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. आणि अक्षय कुमारसोबत हा अनुभव शेअर केल्याने तो आणखी रोमांचक झाला.

मला हा एक सीन आठवतो जिथे मला अक्षयला थप्पड मारावी लागली होती आणि मी संकोच करत होते कारण ते त्याच्या चेहऱ्यावरचे खरे भाव होते." अभिनेत्रीने तिचा जुना 2007 मधील ब्लॉकबस्टर 'वेलकम' आठवला आणि सांगितलं की, मला तोच अनुभव मिळतो.

सुपरस्टार अक्षय कुमार आणि कतरिना कैफची जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप पसंत केली जाते. या दोन्ही कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. याच आधारावर अक्की आणि कतरिनाचा शेवटचा चित्रपट सूर्यवंशी बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी करत होता.