मुंबई : आजही भारतीय समाजात महिलांच्या मासिक पाळीबद्दल बोलणे चांगलं मानलं जात नाही. मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. जर एखादी महिला मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा तिच्या घरातील वृद्ध महिला तिला हे करण्यास मनाई करतात. इतकंच नाही तर महिलांना मासिक पाळीत असताना अनेक निर्बंधांचा सामना करावा लागतो. अशा बदलत्या काळात, सामान्य महिलांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत, त्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक निर्बंधांमधून जावे लागते. यावर अभिनेत्रींचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.
एका मुलखतीत सोनम कपूरनं मासिक पाळी संबंधी तिचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली होती, 'मी 15 वर्षांची होते जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली. त्यावेळी मला घरातील काही ठिकाणी जाण्याची परवानगी नव्हती. माझी आजी मला सांगायची स्वयंपाक घरात जाऊ नकोस, देवघराच्या आसपास जाऊ नकोस. जिथे लोणचं ठेवलेलं असेल त्याचा आजूबाजूला फिरू नकोस. मी मुंबई सारख्या शहरात लहानाची मोठी झाले तरीही मला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या तर मग विचार करा गावातील मुलींना किती काय काय सहन करावं लागत आहे.'
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं स्त्रियांच्या मासिक पाळीवर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत आलिया म्हणाली होती, 'जेव्हा मासिक पाळीच्या काळात स्रियांना धार्मिक स्थळांवर प्रवेश नाकारला जातो तेव्हा मला वाईट वाटतं. अशी कोणत्याही प्रकारची अट त्यांच्यासाठी असणं चुकीचं आहे. जर मासिक पाळीमुळे नव्या जीवाचा जन्म होतो तर मग महिलांच्या मासिक पाळीला अशुद्ध कसं काय म्हटलं जाऊ शकतं.'
बेबो म्हणजेच करीना कपूर मानसिक पाळीबद्दल बोलताना म्हणाली, 'जेव्हा माझ्या मासिक पाळी येण्याची वेळ येते तेव्हा मी गाणी शूट करू शकत नव्हते, म्हणून मी माझे शूटचे काम मासिक पाळीनुसार सांभाळले. त्याचवेळी, प्रॉडक्शन हाऊस आणि कंपन्यांनी हे समजून घेतले पाहिजे की मासिक पाळी बाबतीत हे सर्व नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी त्यांच्यासाठी जे चांगले आहे तेच केले पाहिजे.'
दरम्यान मासिक पाळीच्या काळातील अनुभवांबाबत सोनम कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अभिनेत्री राधिका आपटे आणि श्रद्धा कपूरही आहेत. या अभिनेत्रींनीही त्यांच्या मासिक पाळी विषयी आणि त्यांच्या अनुभवाविषयी सांगितले होते.