पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून कतरिना कैफ म्हणते...

पत्नी नाही दुसरीवरचं जडलाय Vicky Kaushal चा जीव,  कोण आहे ती?  

Updated: Jun 12, 2022, 12:45 PM IST
पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून कतरिना कैफ म्हणते...  title=

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात क्रश हा असतोस. पण फार नशीबान लोक असतात ज्यांना आयुष्यभर त्या खास व्यक्तीची साथ मिळते. बी-टाउन हँडसम हंक अभिनेता विकी कौशल देखील त्या भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहे. ज्याने अभिनेत्री कतरिना कैफवर प्रेम केलं आणि आता कतरिना त्याची पत्नी आहे. दोघे कायम एकमेकांसोबत सोशल मीडियावर  फोटो पोस्ट करत  प्रेम व्यक्त करत असतात. पण आता विकीसोबत दुसरीचं महिला दिसत आहे. 

नुकताचं  दिग्दर्शक-कोरिओग्राफर फराह खानने विकी कौशलला आणखी कोणीतरी सापडल्याचा खुलासा केला आहे. यावर प्रतिक्रिया देण्यापासून कतरिना स्वतःला रोखू शकली नाही.

विकी कौशल सध्या आगामी ‘बंदिश बैंडिट्स’ सिनेमाच्या शूटिंगसाठी क्रोएशियामध्ये आहे. जिथे त्याच्यासोबत फराह खान देखील आहे. फराह खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर विकी कौशलसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. 

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'माफ कर कतरिना त्याने दुसरी शोधली आहे...' असं लिहिलं आहे. यावर प्रतिक्रिया देत कतरिना म्हणाली, 'तुला परवानगी आहे फराह...' सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी काही वर्षे एकमेकांना गुपचूप डेट केलं. त्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे शाही पद्धतीने लग्न केले.

लग्नानंतर ही जोडी अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री आवडते, म्हणूनच चाहते त्यांना 'विकॅट' म्हणतात.