मुंबई : Janhvi Kapoor was spotted by paparazzi in Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) अभिनयासोबत तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. जान्हवीच्या फॅशनने अनेक चाहत्यांना भूरळ पाडली आहे. तिचा लूक नेहमी चर्चेत असतो. जान्हवीला एका रात्री मुंबईत पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्याद कैद केले. (Janhvi Kapoo backless jumpsuit) तिने बॅकलेस जंपसूट घातलेला होता जो काहींना आवडला तर काहींना आवडला नाही, त्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर याचा फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी आपल्या कमेंट्स केल्या आहेत.
जान्हवी कपूर हिचे फॅन- फॉलोअर्स खूप आहेत. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. मात्र, जान्हवी हिच्या एका फोटोने ती ट्रोल होत आहे. सध्या तिच्या फॅशनमुळे चाहत्यांनी जाव्हवीला धारेवर धरले आहे. अलिकडेच जान्हवी कपूर ( Janhvi kapoor ) तिची खास मैत्रीण अभिनेत्री अनन्या पांडे आणि चुलत बहीण शनाया कपूरसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी पोहोचली होती. या डिनरसाठी आलेल्या अनन्या आणि शनायाकडे चाहत्याचे फारसे लक्ष गेले नाही. परंतु, जान्हवी कपूरने घातलेल्या ड्रेसवर सर्वाच्या नजरा रोखून होत्या.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही चाहत्यांनी जान्हवीचे कौतुक केले. तर काही चाहत्यांना तिचा हा लूक पसंतीस पडलेला नाही. याच दरम्यान एका नेटकऱ्याने तिला अभिनेत्री किम कार्दशियन सारखी आहेस का?, मोठी होवून मलायका अरोरा बनणार आहेस काय?, बहुतेक उर्फी जावेदची नक्कल करत आहेस?, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करताना ‘हिला कपडे परिधान करण्याचा सेन्स नाही, असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केला आहे.