Aalia Bhatt चं हे रुप घाबरवणारं, रणबीरचीही खैर नाही; पाहा Video

Gangubai Kathiawadi Trailer ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. याच उत्सुकतेमध्ये आता चित्रपटाचा ट्रेलर सर्वांच्या भेटीला आला आहे.   

Updated: Feb 4, 2022, 01:09 PM IST
Aalia Bhatt चं हे रुप घाबरवणारं, रणबीरचीही खैर नाही; पाहा Video title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ती येतेय... ती येतेय... असं म्हणता म्हणता अखेर ती आलीये. तिच्या रुपात जणू एक कधीही न पाहिलेलं वादळंच आलं आहे. नेमकं कसं आहे ते वादळ, पाहा या व्हिडीओतून. अर्थात अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या आगामी Gangubai Kathiawadi या चित्रपटाच्या ट्रेलरमधून. (Alia bhatt GangubaiKathiawadi)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhansali Productions (@bhansaliproductions)

 

गंगू कोण, कुठली, तिची ओळख काय, ती काय करत हे सगळं काही हा अवघ्या तीन मिनिटांचा ट्रेलर सांगून जातो. 

कमाठीपुऱ्यातील चित्र, तिथली परिस्थिती, वास्तव आणि तिथलं जगणं या साऱ्याचीच झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. 

अभिनेता अजय देवगन, जिम सर्भ अशा कलाकारांचीही झलक या ट्रेलरमधून पाहता येते. ज्यामुळं चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचते. 

जास्त प्रभाव टाकून जाते ती म्हणजे आलिया. कायमच गोड, गोंडस अशा आशयाच्या भूमिका साकारणारी आलिया यावेळी मात्र काहीशा वेगळ्या रुपात दिसत आहे. 

तिचं हे रुप अनेकांना थक्क तर करतच असेल, पण रणबीर कपूरलाही धरकी भरवणारं असंच तिचं 'गंगुबाई काठियावाडी'चं रुप आहे. 

'शक्ति, संपत्ति और सद्बुद्धि तीनों ही औरतें है तो फिर इन मर्दों का किस बात गरूर' असं म्हणताना आलियानं साकारलेल्या पात्राचे डोळेच खूप काही सांगून जातात. 

चित्रपटाच्या कथानकाबाबत थोडं... 
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचं कथानक हुसैन जैदी यांच्या पुस्तकातील 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या संदर्भावर आधारित आहे. 

प्रत्यक्षात आलिया ज्यांची भूमिका साकारतेय त्यांचं नाव, गंगुबाई कोठेवाली असं होतं. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या संपर्कात मुंबईतील अनेक डॉन आणि राजकीय नेते होते. 

60 च्या दशकामध्ये मुंबईच्या अंडर्वर्ल्ड विश्वात गंगुबाईंचं नावही चर्चेत होतं. याच गंगुबाईंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर भन्साळींनी प्रकाश टाकला आहे.