'जगासमोर मुलगी आणि रात्री पत्नीची वागणूक द्यायचे' प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश भट्ट यांच्यावर आरोप

महेश भट्टबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; एकच खळबळ

Updated: Nov 9, 2022, 07:07 PM IST
'जगासमोर मुलगी आणि रात्री पत्नीची वागणूक द्यायचे' प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश भट्ट यांच्यावर आरोप title=

मुंबई : महेश भट्ट (mahesh bhatt)आणि कॉंट्रोव्हर्सी (bollywood controversy) हे काही  नवीन नाहीये, भट्ट कुटुंबीय सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात मग ते महेश भट्ट यांची प्रकरण असो कि मग पूजा भट्ट(pooja bhatt) ने केलेली वक्तव्य असोत. किंवा मग सुशांत सिंह राजपूत प्रकरण असो किंवा मग अभिनेत्रींने त्यांच्यावर शारिरीक शोषणाचे आरोप असोत. महेश भट्ट त्यांच्या बेधडक स्टाइलसाठी ओळखले जातात. नुकतंच एका पाकिस्तानी अभिनेत्रीने दिग्दर्शक महेश भट्टबद्दल काही विधानं केली आहेत आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट हे बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे ज्यांचा वादांशी दीर्घकाळ संबंध आहे. कधी वादग्रस्त विधानांबद्दल, कधी सहकारी सेलिब्रिटींनी केलेल्या आरोपांबद्दल तर कधी आपल्या मुलीसोबतच्या नात्याबद्दल.

या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. अशा परिस्थितीत महेश भट्ट पुन्हा चर्चेत आले आहेत कारण एका अभिनेत्रीने नुकत्याच केलेल्या वक्तव्यात महेश भट्ट तिला दिवसा मुलगी आणि रात्री पत्नी बनवून तिचं शोषण करत असंत.

वास्तविक, आरोप करणारी ही अभिनेत्री पाकिस्तानची आहे. मीरा नावाच्या अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्या चित्रपटात काम केलं आहे. मीराने कराचीमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, महेश भट्ट यांना इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करायचं नव्हतं.  ज्यांच्यामुळे तिने बॉलीवूड सोडलं आणि जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये परत येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिला येऊ दिलं नाही.

मीरा म्हणाली, 'बॉलिवूडमध्ये काम करणं हा तिच्यासाठी खूप चांगला अनुभव होता. मी मुंबईत महेश भट्ट सोडून कोणाला ओळखत नव्हते. मी महेशजींचा खूप आदर करायचे. ते माझे गुरू आणि मार्गदर्शक होते  पण जेव्हा मी 'नजर' या चित्रपटातून माझ्या फिल्मी करिअरची सुरुवात केली तेव्हा राम गोपाल वर्मा सारख्या अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या ऑफर आल्या होत्या, ज्यांना माझ्यासोबत काम करायचं होतं पण महेश भट्ट यांना मी कोणाच्याही सिनेमात काम करावं असं वाटत नव्हतं. 

एका रात्री मी सुभाष घईंना भेटले तेव्हा महेश माझ्यावर ओरडले आणि मला दोन-तीन थोबाडीत मारली.' (Famous bollywood actress accuses Mahesh Bhatt of used to make a daughter in front of the world and a wife at night)

मीराने पुढे सांगितलं की तो खूप विचित्र गोष्टी बोलायचा. तो मला सांगायचा की, तू मला माझी मुलगी पूजा सारखी आहेस आणि नंतर रात्री ते मला तुझ्यावर मी प्रेम करतो असं बोलून माझं शारिरीक शोषण करायचे.