Entertainment : पठाणचा क्लायमेक्स झाला लीक, व्हिलन जॉन अब्राहम नाही तर...?

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण चित्रपटाची धुम, अॅक्शन, थ्रीलर आणि सस्पेन्सने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Updated: Jan 12, 2023, 07:40 PM IST
Entertainment : पठाणचा क्लायमेक्स झाला लीक, व्हिलन जॉन अब्राहम नाही तर...? title=

Pathaan : बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी पठाण (Pathaan) चित्रपटाची चाहत्यांना जबरदस्त उत्सुकता आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) चित्रपटाच्या लूकने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यामुळे चित्रपटाला विरोध केला जात आहे. पण यानंतरही  अवघ्या काही मिनीटांमध्ये या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पठाण चित्रपटाचा ट्रेलर (Pathan Movie Trailer) प्रदर्शित झाल्यानंतर यूट्यूबर (Youtube) नंबर वनला ट्रेंडिंग (Trending) होता. 24 तासांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरला 27 मिलियनपेक्षाही अधिक व्हूज मिळाले आहेत. तर  1.5 मिलियनपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

अॅक्शन, थ्रीलर आणि सस्पेन्स
या ट्रेलरमध्ये शहारुख खान देश वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहे, तर जॉन अब्राहम (John Abraham) देशाला उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. पण या सर्वात दीपिका पदुकोण साकारत असलेल्या भूमिकेनेही सस्पेन्स वाढवला आहे. ट्रेलरमध्ये शाहररुख खान आणि जॉन अब्राहममध्ये जोरदार फाईट दाखवण्यात आली आहे. यावरुनच हा चित्रपट अॅक्शन, थ्रीलरने  आणि सस्पेन्सने भरलेला असणार हे स्पष्ट होतंय. या चित्रपटात दीपिका शाहरुख खानला मदत करताना दाखवण्यात आली आहे. पण यूजर्सच्या मते ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या कहाणीपेक्षा दीपिकाची भूमिका वेगळीच असणार आहे. 

दीपिका मुख्य व्हिलन?
चित्रपटाच्या ट्रेलरबरोबरच दीपिकाचा लूकही सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. दीपिका या चित्रपटात काय कमाल करणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. अशात दीपिका साकारत असलेल्या कॅरेक्टरबद्दलही जोरदार चर्चा आहे. दीपिकाच मुख्य व्हिलन असू शकते असा कयास युजर्स बांधत आहेत. आता चित्रपटात असा काही ट्विस्ट देण्यात आला आहे की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. त्यामुळे शाहरुख-दीपिकाच्या रोमान्सबरोबरच चित्रपटाचा क्लायमेक्स काय असणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 

हे ही वाचा : काजोलची मुलगी न्यासा की शाहरुखची मुलगी सुहाना... कोणाची स्टाईल 'लय भारी'

पठाण रेकॉर्डतोड कमाई करणार?
2022 मध्ये बॉयकॉट ट्रेंडचा जवळपास सर्वच चित्रपटांना फटका बसला होता. पण शाहरुखचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असा अंदाच चित्रपट समीक्षक व्यक्त करतायत. येत्या 25 जानेवारीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला पठाण देशभरात प्रदर्शित होणार आहे.