Diljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....

Diljit Dosanjh Dating Taylor Swift : दिलजीत दोसांझ आणि टेलर स्विफ्ट या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. इतकेच काय तर पापाराझींनी त्यांना कोझी होत असल्याचे पाहिल्याच्या चर्चा आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिलजीत दोसांझनं प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2023, 11:05 AM IST
Diljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि.... title=
(Photo Credit : Social Media)

Diljit Dosanjh Dating Taylor Swift : लोकप्रिय भारतीय सिंगर दिलजीत दोसांझची पंजाबी गाणी ही चांगलीच लोकप्रिय आहेत. त्याचे लाखो चाहते आहेत. दिलजीत हा त्याच्या गाण्यांसोबत तिच्या वक्तव्यांसाठी देखील ओळखला जातो. त्याचं आणि कंगना रणौतचं ट्विटर वॉर तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. पण यावेळी त्याचं चर्चेत येण्याचं कारण काही खासगी आहे. दिलजीत दोसांझ हा अमेरिकन लोकप्रिय सिंगर टेरल स्विफ्टसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

दिलजीत दोसांझ आणि टेलर स्विफ्ट या दोघांना एकत्र स्पॉट केल्याचे वृत्त न्यूज ब्रिटिश कोलम्बियानं दिलं आहे. दिलजीत दोसांझला वॅनक्यूवरच्या कॅक्टस क्लब कॅफे कोल हारबरमध्ये टेलर स्विफ्टसोबत पाहिले. दोघं यावेळी हसत हसत बोलताना दिसले. इतकंच नाही तर ते कोझी झाल्याचे देखील पापाराझींनी पाहिल्याचे म्हटले जाते. टेलर स्विफ्टसोबत असलेल्या या रिलेशनशिपच्या चर्चांवर दिलजीत दोसांझनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत यार प्रायव्हसी नावाची काही गोष्ट नाही. ('यार प्राइवेसी नाम दी वी कोई चीज हुदी आ' ) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळात दिलजीतनं हे ट्वीट डिलीट केलं. आता चर्चा अशी आहे की दिलजीतनं हे ट्वीट डिलीट का केलं. त्या मागचं नेमक कारण काय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिलजीत दोसांझ हा गेल्या बऱ्याच काळापासून यूएसमध्ये आहे. त्यानं नुकताच Coachella त त्याचा एक जबरदस्त परफॉर्मेंस केला आहे. सोशल मीडियावर दिलजीत चांगलाच चर्चेत राहतो. दिलजीत हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर त्याच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहतो. त्याच्या कॉनसर्ट्सला तर अनेक लाखोंच्या संख्येनं लोक हजर राहतात. 

हेही वाचा : अ‍ॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक

दरम्यान, दिलजीत फक्त एक उत्तम गायक नाही तर उत्तम अभिनेता देखील आहे. दिलजीतनं अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची शैली दाखवली आहे. दिलजीतच्या कामा विषयी बोलायचे झाले तर तो लवकच 'अमर सिंह चमकीला' या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर पाहिल्यानंतर दिलजीतच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. हा चित्रपट दिवंगत पंजाबी गायक अभिनेता अमरसिंग चमकिला यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटासाठी दिलजीतला पहिल्यांदाच पगडीशिवाय पाहता येणार आहे.  दिलजीत दोसांझसोबत या चित्रपटात परिणीति चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.