प्लास्टिक सर्जरीवर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या 'मी....'

अमृता फडणवीस यांनी 'बस बाई बस' या सुबोध भावेच्या शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 5, 2022, 03:27 PM IST
प्लास्टिक सर्जरीवर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या 'मी....' title=

मुंबई : ‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. अमृता यांनी या भागात बऱ्याच गोष्टी शेअर केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे. 

अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं आहे. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. प्रेक्षक महिला सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. अमृता यांना सुद्धा एक महिला अमृता यांनी सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यांची प्लास्टिक सर्जरी केलीय का? यावर अमृता बोलतात की बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला कारण यावरून मला अनेकवेळा ट्रोल करण्यात आलं आहे. प्लॅस्टिक सर्जरी ही महागडी गोष्ट आहे. प्लास्टिक सर्जरी एक हिंमतीची गोष्ट आहे. त्यात काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याचे सगळे फिचर्स बिघडू शकतात. त्यामुळे धोकाही असतो', असं अमृता म्हणाल्या.

पुढे अमृता म्हणाल्या, 'मी लग्नाआधी एकदाही ब्यूटी पार्लरमध्ये गेले नाही. लग्नाच्या वेळी जो मेकअप करताता तो मी केला होता. देवेंद्र जींबरोबर माझं लग्न झालं. देवेंद्र जींसाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा पाहत नाहीत तर तिचं मन पाहतात.' अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यावर सर्वांनी त्यांचं कौतुक करत टाळ्या वाजवल्या. याशिवाय त्या गळ्यात मंगळसुत्र का घालत नाही यावर देखील उत्तर दिले आहे.