Love Bite मुळे 'हे' प्रसिद्ध सेलिब्रिटी चर्चेत, व्हायरल फोटोंची एकच चर्चा

सध्या या सेलिब्रिटींचे असेच काही फोटो समोर आले आहेत. ज्यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Updated: Apr 10, 2022, 10:31 PM IST
Love Bite मुळे 'हे' प्रसिद्ध सेलिब्रिटी चर्चेत, व्हायरल फोटोंची एकच चर्चा title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्स आणि त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायला फार आवडते. हे सेलिब्रिटी आपल्या खासगी आयुष्यात काय करतात? कुठे जातात? कोणासोबत जातात, हे सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडते. ज्यामुळे लोक सोशल मीडीयावर देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करतात. हे सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असतात. जे आपले फोटो किंवा व्हिडीओ शेअर करुन आपल्या चाहत्यांना आपल्या संबंधीत माहिती देत असतात.

एवढेच काय तर या स्टार्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पापाराझी देखील त्यांच्या मागेच असतात.

सध्या या सेलिब्रिटींचे असेच काही फोटो समोर आले आहेत. ज्यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. हे फोटो आहेत सेलिब्रिटींच्या लव बाईटचे आहेत.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या लव बाईटला लपवण्याचा प्रयत्न तर केला, परंतु तो लोकांना दिसलाच.

सारा अली खान

सारा अली खान

सारा अली खानच्या लव बाईटच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा फोटो त्या दिवसांचा आहे, जेव्हा सारा अली खान कार्तिक आर्यनला डेट करत होती.

शाहरुख खान

शाहरुख खान

शाहरुख खान अनेक प्रयत्न करुन सुद्धा आपला लव्ह बाईट लपवू शकला नाही. या फोटोत शाहरुख खानचा लव बाईट स्पष्टपणे दिसत आहे.

दीपिका पदुकोण

दीपिका पादुकोण

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अफेअर्सची चर्चा एकेकाळी सामान्य होत्या. दीपिका पदुकोणने अनेक बॉलिवूड कलाकारांना डेट केले आहे. अशा परिस्थितीत दीपिका पदुकोणचे लव बाईट दिसणे ही, काही मोठी गोष्ट नाही.

सलमान खान

सलमान खान

सलमान खानच्या लव बाईटचे फोटोही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सलमान खानने लव बाईटबद्दल मोठे वक्तव्य केले होते. सलमान खानने तो व्हर्जिन असल्याचे सांगितले होते. परंतु त्याच्या शरीरावर दिसणारा हा लव बाईट त्याला खोटं ठरवत आहे. आता नक्की खरं काय हे तर सलमानलाच माहित, पण त्याचं हे लव बाईट खूप काही बोलून जातंय.

कतरिना कैफ

कटरीना कैफ

कतरिना कैफने काही काळापूर्वी विकी कौशलसोबत लग्न केले आहे. कतरिना कैफचा लव बाईटचा फोटो लग्नाआधीच व्हायरल झाला आहे.

अली फजल

अली फजल

लवकरच रिचा चढ्ढा आणि अली लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. परंतु त्यापूर्वीच अली फजलच्या मानेवर लव बाईट पाहायला मिळाला आहे.

मलायका अरोरा

मलाइका अरोड़ा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या नात्याबद्दल बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. मलायका अरोरानेही तिचा लव बाइट्स लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु तो कॅमेरात कैद झालाच.

कंगना राणौत

कंगना रनौत

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी कंगना राणौतचे नावही या यादीत सामील आहे. कंगना रनौत एका इव्हेंटमध्ये आली, तेव्हा तिच्या अंगावर लव बाईट स्पष्ट दिसत होता. त्यावेळी कंगना अभिनेता हृतिक रोशनला डेट करत होती असं म्हटलं जातं आहे.

करीना कपूर खान

करीना कपूर खान

करीना कपूर खान देखील मीडियासमोर आपला लव बाईट लपवू शकलेली नाही. तिच्या अंगावरील लव्ह बाईट अखेर कॅमेरात कैद झालाच.