Taapsee Pannu : वडिलांसोबत 'बोल्ड सीन' पाहताना काय व्हायची तापसी पन्नूची अवस्था?

'बाबा इंग्रजी चित्रपट फार पाहायचे आणि त्यावेळी आमच्याकडे एकच टीव्ही होता.'

Updated: Jul 1, 2021, 02:14 PM IST
Taapsee Pannu : वडिलांसोबत 'बोल्ड सीन' पाहताना काय व्हायची तापसी पन्नूची अवस्था?  title=
तापसी पन्नू

मुंबई : कथानकाच्या अनुषंगाने चित्रपटामध्ये काही दृश्य जोडली जातात. यामध्ये मग साहसी दृश्यांपासून अगदी बोल्ड सीन अर्थात प्रमय दृश्यांचीही बर पडते. बोल्ड सीन चित्रपटांमध्ये असणं ही काही नवी बाब नाही, पण जेव्हा हे बोल्ड सीन घरातल्या कोमा मोठ्या व्यक्तीसोबत पाहण्याची वेळ कोणावर येते तेव्हा मात्र तरुण पिढी किंवा मग घरातली मोठी मंडळी काहीशी संकोचतात. अभिनेत्री तापसी पन्नू हिनंही अशाच परिस्थितीचा सामना केला आहे. 

'हसीन दिलरुबा' या चित्रपटाच्या निमित्तानं चर्चेत असणाऱ्या तापसी पन्नू हिनं नुकतंच एका मुलाखतीत तिच्या खासगी जीवनातील एक प्रसंग शेअर केला. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तापसी, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे या तिन्ही कलाकारांनी त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देत यासंदर्भातील खुलासा केला. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्ही बोल्ड, हॉट सीन पाहत आहात आणि त्याचवेळी तिथे कुणी आलं?, असा प्रश्न या तिन्ही कलाकारांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाचं उत्तर देत एकदा आपण भावंडांसोबत असंच काहीसं पाहत असताना तिथंच एक काकू आल्या होत्या असा खुलासा विक्रांत मेस्सी यानं केला. तर, हर्षवर्धननंही असाच एक किस्सा शेअर केला. तापसीनं मात्र असं काही पाहताना आपण कधी पकडलो गेलो नसल्याचं स्पष्ट करत वडिलांसोबत चित्रपट पाहताना असं कोणतं दृश्य सुरु झालं तर नेमकी काय अवस्था होत होती याचा उलगडा केला. 

'समांतर'मधील तेजस्विनी-स्वप्निलचा इंटीमेट सीन घालतोय धुमाकूळ

 

'बाबा इंग्रजी चित्रपट फार पाहायचे आणि त्यावेळी आमच्याकडे एकच टीव्ही होता. त्यामुळे बाबांनी टीव्ही पाहण्यास सुरुवात केली, की नाईलाजानं आम्हालाही तेच पाहावं लागत होतं. आम्ही खास चित्रपट पाहायला कधी बाहेर जात नसू. त्यामुळं बोल्ड किंवा लव्ह मेकिंग सीन वगैरे सारंकाही ठीकच होतं. पण, बाबांना अनेकदा त्यांच्या वयात आलेल्या मुलींसोबत बसून अशी दृश्य पाहता अवघडल्यासारखं होत होतं. त्यावेळी आम्ही सर्वजण तिथे आहोत आणि असं एखादं दृश्य सुरु झालं तर आम्हाला घामच फुटायचा. कोणाला कोय करायचंय हेच समजून घ्यायला आम्ही वेळ घालवायचो. हा अवघडलेपणा दूर करण्यासाठी आम्हाला एकच मार्ग दिसायचा, तो म्हणजे अचानकच पाणी आणण्यासाठी उठून जाणं, किंवा मग चॅनलच बदलणं. हे असं माझ्यासोबत अनेकदा घडलं आहे', असं तापसी म्हणाली. 

तापसीचा हा अनुभव ऐकताना अनेकांनाच त्यांच्या घरीही अशीच काहीशी परिस्थीती उदभवल्याची आठवण झाल्यावाचून राहणार नाही, हेच खरं.