Ajit Pawar Facebook Account Hacked: अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे.अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना फॉलो केल्याचं अजित पवारांच्या फेसबुक अकाऊंटहून अडल्ट कंटेंट असलेल्या एका पेजला फॉलो करण्यात आलं.त्यानंतर काही लोकांनी पेजला फॉलो केलंय.त्यामुळे अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा आहे.सोशल मीडियावर जोरदार मिम्सही व्हायलरल होत आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक अकाऊंटहून अडल्ट कंटेंट असलेल्या पॕगलेट क्लिव नावाच्या फेसबूक पेजला काल रात्री फॉलो केले गेले. यापूर्वी अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरून 4 जणांना फोलॉ केले जात होते. त्यात रात्री पाचवी भर पडली. यामध्ये पार्थ अजित पवार, एनसी स्पीक्स, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या नावाचा समावेश होता. पण या चौघा अकाऊंटसोबत पॕगलेट क्वीन अकाऊंटला फॉलो करण्यात आले.
पॕगलेट क्वीन या पेजवर सगळा कंटेट अडल्ट कंटेंट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडिया हॅंडल करणाऱ्या जबाबदार व्यक्तीच्या अकाउंटहून असा प्रकार झाला की अकाऊंट हॅक झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी सोशल मीडियावर जोरदार मिम्सही व्हायलरल होत आहेत. यानंतर अजित पवार यांच्या स्वत:च्या अकाउंटहून फॉलोविंग लिस्ट प्रायव्हेट करण्यात आली आहे.