Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी पहिल्यांदा सोनं 2600 डॉलरच्या उच्चांकावर वधारले होते. मात्र, त्यानंतर मौल्यवान धातुच्या दरात घट झाली होती. आज गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी वायदे बाजारात मोठी घट झाली आहे. सराफा बाजारातही सोनं-चांदीच्या दरात घाट झाली आहे. लवकरच नवरात्र व दिवाळी या सणांना सुरुवात होणार आहे. त्याआधीच सोन्याच्या दरात घट होत असल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
आज सकाळी MCXवर सोनं 280 रुपयांनी घसरलं आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 74,450 रुपयांवर स्थिरावलं आहे. सोनं 75 हजारांच्या खाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोन्यानं 75 हजारांचा पल्ला गाठला होता. मात्र आता सोन्याने भाव कोसळले आहेत. तर, चांदीच्या दरातही किंचितशी घसरण झाली आहे. चांदी आज 30 रुपयांनी घसरली असून 88,269 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. तर, काल चांदी 88,299 रुपयांवर स्थिरावली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2600 डॉलरने उसळले होते. त्यानंतर 40 डॉलरने घसरण झाली होती. तर, चांदी जवळपास 2 टक्क्यांनी घसरून 30 डॉलरच्या आसपास पोहोचली होती. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 68,250 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 55,840 रुपयांवर पोहोचले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 68,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 74,450 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 55,840 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,825 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 445 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 584 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 54, 600 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 59, 560 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 44, 672 रुपये
22 कॅरेट- 68,650 रुपये
24 कॅरेट- 74,890 रुपये
18 कॅरेट- 56,170 रुपये