'समांतर'मधील तेजस्विनी-स्वप्निलचा इंटीमेट सीन घालतोय धुमाकूळ

हा सीन व्हायरल होताच हिंदी सह आता मराठी वेबसिरिजला देखील बोल्ड अँगल देण्यात येत असल्याची चर्चा रंगतेय. 

Updated: Jul 1, 2021, 01:17 PM IST
'समांतर'मधील तेजस्विनी-स्वप्निलचा इंटीमेट सीन घालतोय धुमाकूळ title=

 मुंबई : अभिनेता स्वप्निल जोशीच्या 'समांतर 2' या वेबसिरिजची सध्या सगळीकडेच हवा आहे. अखेर ही मोस्ट अवेटेड वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरिजच्या पहिल्या सीजनमधील ड्रामा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला. मात्र आता दुसरा सीजन रिलीज होताच, समोर आलेला स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यातील बोल्ड सीनमुळे चांगलाच धुमाकूळ घालतोय.

30 जुनला समांतरचा दुसरा सीजन रिलीज झाला आहे. यावेळी तेजस्विनीने या सीजनमधील एक इनसाईड सीनचा वेळीच फोटो शेअर करत प्रेक्षकांचं लक्षवेधून घेतलंय. ज्यात स्वप्नील आणि तेजस्विनी यांचा इंटीमेट सीन पाहायला मिळतोय. हा सीन व्हायरल होताच हिंदी सह आता मराठी वेबसिरिजला देखील बोल्ड अँगल देण्यात येत असल्याची चर्चा रंगतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

एका वर्षाआधी समांतरचा पहिला भाग रिलीज झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी वर्षभर या वेबसिरिजचा दुसरा सीजन केव्हा येणार ? हा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून स्वप्नीलला विचारायला सुरुवात केली. 

सध्या सिनेमागृह शर्ट डाऊन असताना मोठा प्रमाणात प्रेक्षकवर्ग हा ओटीटीकडे वळला आहे. आणि याचा फायदा सध्या रिलीज होणाऱ्या वेबसिरिजला होतोय. त्यामुळे नुकताच भेटीला आलेला समांतर 2 काय कमाल करतो हे पाहणं इंटरेस्टींग ठरेल.