आमीर खानने मुंबईत खरेदी केलं तब्बल 9.75 कोटींचं घर; उत्तर प्रदेशात तब्बल 22 घरं, जाणून घ्या एकूण संपत्ती

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने मुंबईत नवं घर विकत घेतलं आहे. तब्बल 9 कोटी 75 लाखांना त्याने हे घऱ विकत घेतलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Jun 27, 2024, 06:06 PM IST
आमीर खानने मुंबईत खरेदी केलं तब्बल 9.75 कोटींचं घर; उत्तर प्रदेशात तब्बल 22 घरं, जाणून घ्या एकूण संपत्ती title=

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने मुंबईत एक आलिशान घर विकत घेतलं आहे. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाली हिलमध्ये आमीर खानने हे घऱ घेतलं आहे. इमारतीमधील या आलिशान घरासाठी आमीर खानने तब्बल 9 कोटी मोजले आहेत. SquareYards.com ने प्रॉपर्टीच्या कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, आमीर खानने 9 कोटी 75 लाखांना हे अलिशान घर घेतलं आहे. 

आमीर खानच्या संपत्तीत आणखी एका घराची वाढ

आमीरने घेतलेलं हे घर पूर्णपणे तयार आहे. आमीरचं घर अंदाजे 1027 चौरस फूट (कार्पेट एरिया) आहे. 25 जून रोजी झालेल्या हस्तांतरण करारावर 58.5 लाखांची स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजारांची रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली आहे. 

ही मालमत्ता Bella Vista Apartments मध्ये आहे. पाली हिल्स परिसरात असणारी ही एक उच्चभ्रू निवासी इमारत आहे. हा परिसर मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि मागणी असलेल्या निवासी क्षेत्रांपैकी एक मानला जातो. येथील शांत वातावरण, हिरवळ आणि समुद्रापासून जवळ असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. 

आमीरची मुंबईत इतरही घरं आहे. या आमिरकडे बेला व्हिस्टा अपार्टमेंट्स तसंच पाली हिल्समधील मरीना अपार्टमेंट्समध्ये आधीच अनेक मालमत्ता आहेत. महत्त्वाचं म्हणजे, बेला व्हिस्टा आणि मरीना अपार्टमेंट्स दोन्ही पुनर्विकासासाठी सज्ज आहेत.

आमीरची संपत्ती

आमीरचं वांद्रे येथे 5,000 स्वेअर फुटांचं प्रशस्त सी फेसिंग घर आहे. तब्बल दोन माळ्यांचं हे घर आहे. पार्टी आणि गेट-टूगेदर आयोजित करण्यासाठी येथे एक मोठी जागा आहे. 2013 मध्ये त्याने पाचगणी येथे 7 कोटींना फार्महाऊस खरेदी केलं जे 2 एकरमध्ये पसरलं आहे. आमीरने व्यावसायिक मालमत्तांमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शहााबाद येथेही त्याच्याकडे २२ घरे असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

लाल सिंग चड्ढा हा आमीरचा शेवटचा चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपट अयशस्वी ठरला होता. त्याच्या प्रोडक्शनच्या 'लापता लेडीज' चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सध्या तो 'सितारे जमीन पर' चित्रपटात व्यस्त आहे, जो या वर्षी ख्रिसमसच्या आसपास मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.