Shirdi Saibaba Temple : साई मंदिर परिसरातील अब्दुलबाबा समाधीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा खाजगी लोक घरी घेऊन जात असल्याचा खळबजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
साई मंदिर परिसरात साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी आहेत. इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानकडे जमा होतो तर अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर आक्षेप घेतला आहे. हा सगळा प्रकार बेकायदेशीर आहे.समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा अशी आमदार जगताप यांची मागणी आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थानकडे केली होती. जेवणासाठी 25 रुपये शुल्क घ्या..अशी मागणी त्यांनी केलीये. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा असं ते म्हणालेत.. शिर्डीतील शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी ताशेरे ओढलेत. यावरुन वाद निर्माण झाल्यावर सुजेय विखे पाटील यांनी खुलासा केला. आपण आपल्या वक्तव्याशी ठाम राहणार असून, आपण कुठल्याही साईभक्ताला हिणवलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मागील 3 वर्षांत 4 हजार भिका-यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.
मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर कोईबतोर तामिळनाडूमधील एस वाडीवल या साईभक्तानं साईचरणी 80 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी अर्पण केलीये. या साखळीची किंमत 5 लाख 73 हजार रुपये इतकी आहे.. दरम्यान साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीनं वाडीवेल यांचा शाल आणि साईंची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला..