'काय खाऊन जाड्या झालात?' नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली 'तुझ्या पिताश्रींचं...'

मेघाला तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मेघाने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.  

Updated: Feb 22, 2024, 10:51 PM IST
'काय खाऊन जाड्या झालात?' नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली 'तुझ्या पिताश्रींचं...' title=

Megha Dhade Answer Trollers : बिग बॉस मराठीचे पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वातून अनेक कलाकार हे घराघरात पोहोचले. याच पर्वाची विजेती म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी मेघाने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता तिने एका नव्या व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. पण आता मेघाला तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मेघाने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

मेघा धाडेने नुकंतच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मेघा धाडे ही तिच्या जीवाभावाच्या मैत्रीण सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत या दोघींबरोबर सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी त्या तिघी जणी मेघाच्या नवीन व्हिलावर मजा मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी तिने झोक्यावर झुला घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मेघा धाडे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत या तिघी जणी या झोक्यावर बसल्याचे दिसत आहेत. यावेळी त्या हसताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या तिघींना वजनावरुन ट्रोल करण्यात आले. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यावर अभिनेत्री मेघा धाडेने चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने ‘झोका तुटेल…तीन हत्ती.’ असे म्हटले आहे. त्यावर मेघा धाडेने “झोक्याची काळजी करू नकोस स्वतःची कर. उगाच समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं उंदरा” अशा शब्दात त्याला खडेबोल सुनावले आहेत. 

तर दुसऱ्याने ‘काय खाऊन एवढ्या जाड्या झालात सई आणि मेघा’ असा प्रश्न विचारला आहे. त्यावर मेघाने काय खाऊन ते माहित नाही. पण तुझ्या पिताश्रींचं नक्कीच नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने तू किती जाडी झाली आहे, अशी कमेंट केली आहे. त्यावर मेघाने आणि तू किती बेशिस्त, असे त्याला म्हटले आहे. मेघाने ट्रोल करणाऱ्यांना दिलेली हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. 

Megha Dhade Comment

दरम्यान, मेघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. पण सध्या ती राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. मेघाने काही महिन्यांपूर्वी भाजपत प्रवेश केला. भाजपाने मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती केली आहे. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.