सिनेमांमध्ये गर्लफ्रेंड फिरवणारा अभिनेता होणार आजोबा...

अभिनेत्या कुटुंबात आनंदाचं वातावण, पण सोशल मीडियावर का होतोय ट्रोल...  

Updated: Mar 22, 2022, 11:25 AM IST
सिनेमांमध्ये गर्लफ्रेंड फिरवणारा अभिनेता होणार आजोबा... title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर लवकरचं पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोनमने सोशल मीडियावर पती आनंद अहूजासोबत फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कपूर आणि अहूजा कुटुंब आता नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सोनमचा फोटो व्हायरल होत असताना अभिनेते अनिल कपूर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. 

एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांची लाडाची लेक सोनम आणि तिचा पती, आनंद अहूजा आता त्यांच्या या नात्यात एका नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अनिल यांनी देखील सोशल मीडियावर सोनमचा फोटो पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना शुभेच्छा तर दिल्या, पण काहींनी त्यांना ट्रोल देखील केलं. अनिल यांनी लेकीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'आता मी जीवनातील मजेदार भूमिका साकारण्यासाठी तयारी करत आहे.'

ते पुढे म्हणाले, 'आपलं आयुष्य कायम एकसारखं राहू शकत नाही. मी यासाठी आभार मानू शकत नाही, पण मी कृतज्ञ आहे... सोनम कपूर आणि आनंद अहूजा तुम्ही ही बातमी देवून आम्हाला आनंदी केलंय...'

अनिल यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. पण काही मात्र त्यांना ट्रोल करत आहे. 'बातमी चांगली आहे पण फोटो वाईट आहे..' तर दुसऱ्या युजरने 'तुम्हाला आधिचं सर्व काही माहिती होतं....', 'जगातील सर्वंत तरूण आजोबा...'असे कमेंट करत त्यांना ट्रोल केल जात आहे.