संसाराची तयारी; लग्नाआधी मराठमोळ्या कपलनं गुपचूप घेतलं आलिशान घर? नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण

Amruta Deshmukh and Prasad Jawade : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. त्यांच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांनी लग्नाआधीच नवं घरं घेतल्याची चर्चा आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 25, 2023, 05:00 PM IST
संसाराची तयारी; लग्नाआधी मराठमोळ्या कपलनं गुपचूप घेतलं आलिशान घर? नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण title=
amruta deshmukh and prasad jawade buys new house nameplate photos goes viral

Amruta Deshmukh and Prasad Jawade : आपलं घरं असणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यातून नव्या संसाराची सुरूवात करताना आपला नव्या घरात प्रवेश झाला की आपला आनंद अगदीच गगनात मावेनासा होता. खासकरून हल्ली अनेक मराठी कलाकारही नवी गाडी आणि नवं घरं विकत घेताना दिसत आहेत. प्राजक्ता गायकवाड, ऋतूजा बागवे यांनीही आपल्या नव्या घरात प्रवेश केला आहे. त्याचसोबतच अभिनेत्री स्मिता शेवाळे, दिग्दर्शक रवी जाधव यांनीही नवी गाडी विकत घेतली आहे. आता सध्या चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची. त्यांच्या साखरपुड्याची जोरात चर्चा होती. आता त्या दोघांनी नवीन घरं देखील घेतलं आहे. सध्या त्यांनी आपल्या घराचे नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. किंबहूना त्यांच्या घराच्या नेमप्लेटनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्यांनी नवीन घर घेतलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

काल दसऱ्याच्या शुभमुहर्तावर सेलिब्रेटींनीही आपल्या प्रियजनांसोबत एकत्र वेळ व्यतित केला होता. त्याचप्रमाणे अमृता आणि प्रसादनंदेखील एकमेकांसोबत वेळ घालवला होता. यावेळी त्यांनी दसऱ्याच्या निमित्तानं त्या दोघांचे खास फोटो शेअर केले होते. त्या दोघांनी पिवळ्या आणि केशरी रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी त्यांनी काढलेल्या फोटोंपैंकी एका फोटोची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांनी घराच्या दरवाज्याच्यासमोर उभं राहून फोटो काढला आहे. यावेळी त्यांच्या दाराच्या नेमप्लेटनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्याला माहितीच आहे की प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे दोघं बिग बॉस मराठीच्या सिझन 4 मध्ये आले होते. 

हेही वाचा : '...पुरूषाच्या पावतीची गरज नाही'; दुसऱ्या लग्नाबद्दल तेजस्विनी पंडितचं परखड उत्तर

बिग बॉसच्या घरात गेल्यावर बाहेरही स्पर्धकांची नेमप्लेट लावलेली असते. यावेळी त्या दोघांच्याही बिग बॉसमधली नेमप्लेट यावेळी त्यांच्या घराच्या बाहेर पाहायला मिळाली यावरून त्या दोघांनी लग्नाआधी घर घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. नुकतेच त्यांच्या केळवणाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचा साखरपुडा झाला असून आता त्यांचा विवाहसोहळाही पुढील महिन्यात संपन्न होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघंही मराठी मालिका, चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. बिग बॉसमध्येच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.