'स्वत:च्या मुलींचे चेहरे कधी दाखवत नाहीस पण...', म्हणत क्रांती रेडकरवर टीका; अभिनेत्रीनं दिलं जशास तसं उत्तर

Kranti Redkar slams troller for not showing her daughter's face : क्रांती रेडकरनं सोशल मीडियावर मुलींचा चेहरा न दाखवण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 25, 2023, 04:32 PM IST
'स्वत:च्या मुलींचे चेहरे कधी दाखवत नाहीस पण...', म्हणत क्रांती रेडकरवर टीका; अभिनेत्रीनं दिलं जशास तसं उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Kranti Redkar slams troller for not showing her daughter's face :  मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर ही अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रात देखील आहे.  याशिवाय क्रांती दिग्दर्शिका देखील आहे. क्रांती ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण तरी सुद्धा तिनं आजवर कधीच तिच्या मुलींचा चेहरा व्हिडीओत दाखवला नाही. पण असं का असा थेट सवाल तिला एका नेटकरीनं विचारला आहे. यावेळी मात्र, क्रांती शांत बसली नाही तर तिनं नेटकरीला सडेतोड उत्तर दिले आहे. 

क्रांतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत क्रांतीनं तिच्या घरी करण्यात आलेल्या कन्या पुजनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या घरी पूजेसाठी आलेल्या सगळ्या मुलींची कशी पूजा केली आणि त्यांना काय काय भेट वस्तू दिल्या ते दाखवले आहे. तर या पूजेत तिला मदत करण्यासाठी तिच्या दोन्ही मुली देखील होत्या. मात्र, त्यांचा चेहरा या व्हिडीओ कोणाला पाहायला मिळाला नाही. त्यावरून काही नेटकऱ्यांनी क्रांतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, क्रांतीनं देखील त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर

व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाली, 'मॅडम तुम्ही स्वत:च्या मुलींचे चेहरे दाखवत नाही आणि इतर मुलींचे व्हिडीओ काढून त्यांचे चेहरे दाखवताय हा अभिकार कोणी दिला? पूर्वीच्या व्हिडीओंमध्ये देखील स्वत:च्या मुलींचा चेहरा दाखवलेला नाही हे शोभत नाही तुम्हाला.' ही कमेंट पाहता क्रांती थांबली नाही आणि तिनं थेट सडेतोड उत्तर दिले आहे. क्रांती म्हणाली, 'पोस्ट करण्यासाठी त्या मुलींचे आई-वडिलचं व्हिडीओ काढत होते… काळजी नसावी. छबील आणि गोदोच्या संरक्षणाची जबाबदारी तुम्ही घेता का?, तर मी दाखवते चेहरे…निदान व्हिडीओची भावना तरी समजून घ्या. सारखं आपलं काहीही बोलू नका. सतत नकारात्मक विचार करत बसू नका.' फक्त क्रांती नाही तर तिचा पाठिंबा देत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की क्रांती ही अभिनेत्री आहे आणि त्यातही वानखेडे यांची पत्नी. त्यांच्या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या मुलींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. त्या दोघी खूप लहाण आहेत. त्यामुळे त्या दोघींचा चेहरा दाखवावा असं सतत कोणी म्हणून नये. 

हेही वाचा : पती तुरुंगात गेल्याने देश सोडणार होती शिल्पा शेट्टी...; राज कुंद्रानेच केला मोठा खुलासा

क्रांती आणि समीर वानखेडे यांच्या मुलींविषयी बोलायचे झाले, तर 2018 मध्ये क्रांतीनं जुळ्या मुलींना जन्म दिला. त्या दोघींची अनेक व्हिडीओ क्रांती शेअर करताना दिसते. आता त्या दोघी पाच वर्षांच्या आहेत.