मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधीत अनेक खुलासे देखील करतात. या शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. केबीसीच्या मंचावर स्पर्धक अनेकदा बिग बींसोबत त्यांच्या मनातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये, बिहारचा रहिवासी सक्षम पराशकर हॉट सीटवर पोहोचला आहे. यावेळी सक्षमनं खुलासा केला की तो मायनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. या दरम्यान अमिताभ यांनी देखील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
सक्षम पराशकर यांनी सांगितले की, तो 24 वर्षांचा आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर असून फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनीत काम करतो. पुढे, सक्षम सांगतो की त्याला कम्प्युटर सायन्स घ्यायचे होते पण त्याच्या कुटुंबीयांमुळे तो मायनिंग इंजीनियर झाला. तो म्हणाला की, माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की मी सरकारी नोकरी करावी. बिहारी पालकांना सरकारी नोकरीची गरज आहे.
अमिताभ सक्षमला मायनिंग इंजीनियक झाल्यानंतरचा अनुभव विचारतात? यावर उत्तर देत सक्षम म्हणाला की सर, मला खाणकाम करावं लागत नाही हे माझ्या लक्षात आलं. हे ऐकून बिग बी हसायला लागतात आणि म्हणतात की अजून एक माणूस आहे ज्यानं खाणकाम सोडलं आहे आणि तो तुमच्या समोर बसला आहे. फार कमी लोकांना माहित असेल की चित्रपटात येण्यापूर्वी अमिताभ धनबादमधील कोळशाच्या खाणीत काम करायचे.
बिग बी यांनी सक्षमला विचारले की तू चित्रपट पाहतोस का? उत्तर देत सक्षम म्हणाला, नाही सर, मला फारसा रस नाही. यानंतर अमिताभ म्हणतात की जा मी तुझ्याशी बोलणार नाही कट्टी. चित्रपट पाहिला नाही तर आमचं काम कसं चालेल. 80 हजारांच्या प्रश्नावर सक्षमनं शो सोडला होता. या कार्यक्रमात सक्षम आणि अमिताभ यांच्या संभाषणाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.