Bollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड

Rekha Jaya Bachchan : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी जया आणि रेखा यांची मैत्री होती. त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहायच्या. अगदी त्या दोघींचा एक कॉमन फ्रेंड होता. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

नेहा चौधरी | Updated: Aug 9, 2023, 11:10 AM IST
Bollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड title=
amitabh bachchan jaya rekha same building juhu mumbai bollywood legends entertainment news today

Amitabh Bachchan Rekha : बॉलिवूड बादशाह बिग बी अमिताभ बच्चन आणि एव्हग्रीन रेखा यांची प्रेम कहाणी प्रत्येकाला माहिती आहे. आजही या दोघांच्या लव्ह लाइफमधील अनेक किस्से समोर येतं असतात. अमिताभ आणि रेखा यांची लव्ह अफेयर बद्दल जेव्हा जया बच्चन यांना कळलं त्यानंतर बॉलिवूडमध्ये या दोघींमधील नाराजीबद्दल अनेक किस्से आहेत. (amitabh bachchan jaya rekha same building juhu mumbai bollywood legends entertainment news today )

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकेकाळी रेखा आणि जया मैत्रीणी होत्या. एवढंच नाही तर त्या एकाच इमारतीतही राहायच्या. या दोघींचा एक कॉमन फ्रेंडही होता. तुम्हाला वाटतं असेल की ते बिग बी असेल, पण नाही तो व्यक्ती कोणी दुसराच होता. 

या दोघींचा तो मित्र होता याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अली पीटर जॉन यांनी सांगितलं आहे. खरं तर हा रेखा जया आणि अमिताभ बच्चन या तिघांचा अतिशय जवळचा मित्र होतो. 

त्यांनी सांगितलं की, 1970 त्या दशकात मुंबईतील जुहूमधील (Juhu Mumbai) हरे कृष्ण मंदिराजवळ एक बिल्डिंग बांधण्यात आली होती. या इमारतीचं नाव होतं बीच अपार्टमेंट (Beach Apparent). या बिल्डिंगमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार राहत होते. 

हॉटेलपासून बिल्डिंगपर्यंत 

या इमारतमध्ये एफटीआईआई (FTII, Pune) मधून सिनेसृष्टीशी संबंधित शिक्षण घेतलेले अनेक कलाकार भाड्याने राहत होते. यामध्ये एक नाव होतं दक्षिणेतून आलेल्या अभिनेत्री रेखा हिचं. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रेखाचा बोलबाला होता. या इमारतीत राहण्यापूर्वी रेखा मुंबईतील अजंता हॉटेलमध्ये (Ajanta Hotel Mumbai) बरेच महिने राहिली होती. एफटीआईआई अभिनयाचे धडे गिरवणारी जया बच्चन देखील याच इमारतीत राहत होती. जया भादुरी यांचा पहिला सिनेमा गुड्डी (Film Guddi) चाहत्यांना खूप आवडला होता. 

'हा' होता कॉमन फ्रेंड

एकाच इमारतीत राहत असलेल्या रेखा आणि जया बच्चन यांच्यामध्ये मैत्री झाली. सिनेमासृष्टीमध्ये करिअर करत असताना त्या दोघी एकमेकांशी चर्चा करायच्या. या दोघींचा एक कॉमन मित्रदेखील होता. त्याचं नाव होतं असरानी. एफटीआयआयमधून उत्तीर्ण झाल्यानंतर असरानी मुंबईच्या चित्रपटसृष्टीतही संघर्ष करत होता. त्यानंतर असरानी आणि जया, रेखा या दोघी अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली. 

असंही एक चर्चा होती की, त्या काळात जेव्हा या दोघींच्या शूटिंगचं टाइमिंग एकच असलं तेव्हा या दोघी एकत्र जायच्या. हा तोच काळ जेव्हा जया आणि अमिताभ यांची पहिली भेट झाली होती. अमिताभ बच्चन त्यावेळी स्ट्रगलिंग एक्टर होता. जया बच्चन या स्टार होत्या, त्यामुळे त्या अमिताभ यांना वेगवेगळ्या चित्रपटाच्या शूटिंगला सोबत घेऊन जात होत्या. 

...म्हणून तुटली मैत्री

काही दिवसांनी या जया आणि अमिताभ यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 11 फ्लॉप चित्रपट केल्यानंतर अमिताभ यांना जंजीर (Film Zanjeer) या चित्रपटातून स्टारडम मिळालं. यात जया भादुरी त्यांची अभिनेत्री होती. यानंतर अमिताभ आणि जया भादुरी यांनी लग्न केलं. 

लग्नानंतर जुहूच्या या इमारतीतून निघून जया बच्चन अमिताभ यांच्या बंगल्यात (Amitabh Bachchan Bunglow) पोहोचली. तर रेखाने उंच शिखरावर पोहोचल्यानंतर वांद्रातील बँडस्टँडमध्ये (Bandra Bandstand) समुद्राच्या समोर बंगला खरेदी केला. याच वेळी लग्नानंतर जया बच्चन यांनी काही काळासाठी फिल्मी दुनियाचा ब्रेक घेतला. मग अमिताभ आणि रेखा यांचे अनेक चित्रपट आले आणि त्यांच्या जवळीक वाढल्याचा बातम्या समोर आल्यात. 

एकेकाळी एकाच इमारतीत राहणाऱ्या या दोन मैत्रींणीच्या मैत्रीला तडा गेला. त्यानंतर या दोघींनी एकमेकींकडे कधीही वळून पाहिलं नाही.