नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ, Video पाहून कमेंट करत म्हणाले...

Neena Gupta Bold Look in Black Dress : नीना गुप्ता या नुकत्याच मुंबईत एका पार्टीत स्पॉट झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

दिक्षा पाटील | Updated: Aug 9, 2023, 10:22 AM IST
नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ, Video पाहून कमेंट करत म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Neena Gupta Bold Look : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही काही मेसेज देऊन जातात. इतकंच नाही तर त्यांच्या अनेक पोस्ट इतक्या मजेशीर असतात की अनेक नेटकरी त्याला रीपिट पाहतात. याशिवाय या वयातही त्यांची ड्रेसिंग ही प्रेक्षकांना भूरळ पाडणारी आहे. त्यांचा एक नवा लूक समोर आला असून त्यात नीना या हॉट दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांना पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत नीना गुप्ता यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये नीना गुप्ता प्रचंड हॉट दिसत आहेत. त्यांचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. खरंतर वयाच्या 64 व्या वर्षा नीना गुप्ता यांचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले. काही नेटकऱ्यांनी नीना गुप्ता यांची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी त्यांना वयाचा विचार करायला हवा असे सांगितले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला या गोष्टीचं चांगलं वाटत आहे की त्यांनी इतरांना काय वाटतं या गोष्टीचा विचार केला नाही. त्यांना हवं तसे कपडे त्यांनी परिधान केले. त्यात त्या सुंदरही दिसत आहेत.' दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'काकू नाही मुलगी दिसते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कपडे फार सुंदर आहेत. नीना गुप्ता यांच्या या लूकवरून अनेकांनी त्यांना ट्रोलही केले आहेत.' एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'सध्या लोक त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसण्याचा खूप प्रयत्न करतात... माझी इच्छा आहे की त्यांना या गोष्टीविषयी कळायला हवं की वृद्धपण देखील सुंदर असतं त्याचं एक वेगळं चार्म आहे. मी कोणाला कारणीभूत ठरवत नाही किंवा चुकीचं म्हणतं नाही, आपण लोकांचं वय झालं की त्यांना ट्रोल करतो त्यामुळे हे लोक असं करतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्या या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल दिसत आहेत. असे कपडे परिधान का करायचे? असे लोक नेहमीच साडीत सुंदर दिसतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'वयाचा विचार करायला हवा... हे मुळीच चांगलं दिसत नाही.'