मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन हिंदीचे महान कवी आणि लेखक होते. त्यांची 'मधुशाला' आज देखील अव्वल दर्जाची कविता मानली जाते. हरिवंश राय बच्चन यांच्या अनेक लेखण्या बिग बींनी सांभाळून ठेवल्या आहेत. पण घर बदलल्यामुळे वडिलांनी लिहिलेले लेख आणि कविता बिग बींकडून हरवल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून स्पष्ट झळकत आहे.
बिग बी म्हणतात, 'अत्यंत रागात आहे. कारण घर बदलल्यामुळे वडिलांच्या अनेक लेखण्या मिळत नाही. जेव्हा मी त्यांनी लिहिलेले लेख वाचले त्यांच्या आत्मकथेमध्ये वाचले त्याठिकाणी त्यांचे संदर्भ होते. आता माहिती नाही ते लेख कोठे आहेत. एक अशी घटना जी लक्षात आल्यानंतर देखील ती घटना घडल्याचा अनुभव होत नाही..'
बातमी : http://अमिताभ बच्चन यांच्या नव्या आलीशान घराची चर्चा, आता सनी लिओनीचे शेजारी
'एक निष्काळजीपणा... त्यानंतर ती वस्तू शोधा... वस्तू सतत शोधल्यानंतरही सापडत नाही... तिचा वापर करू शकत नाही...कधीकधी मला आश्चर्य वाटते की या दस्तऐवजांची नोंदणी करणं महत्त्वाचं आहे. अशा वेळी मला वडिलांची आठवण येते आणि मनात विचार येतो की, जर वडिलांनी असं केलं नसतं तर मी कोठे असतो... '
बिग बींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, बिग बी लवकरचं 'कोन बनेगा करोडपती 13'शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय बिग बी ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, मेडे आणि गुडबाय या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.