Amber Heard Pregnant After 7 Year of Divorce : हॉलिवूड सेलिब्रिटी जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी अॅम्बर हर्डच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. अॅम्बर हर्ड ही जॉनी डेपला दिलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. घटस्फोटानंतर अॅम्बर ही स्पेनमध्ये तिच्या पहिल्या बाळासोबत राहत आहे. तर आता ती पुन्हा एकदा आई होणार असल्याची बातमी तिच्या टीमनं दिली आहे.
अॅम्बरच्या टीमनं People मॅगझीनशी बोलताना सांगितलं की प्रेग्नंसीची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे आम्हाला आताच जास्त माहिती द्यायची नाहीये. अॅम्बर तिच्या स्वत: साठी आणि तिच्या पहिल्या बाळासाठी आनंदी आहे. अॅम्बर पहिल्यांदा एप्रिल 2021 मध्ये आई झाली होती. तिच्या पहिल्या बाळाचा जन्म हा सरोगसीच्या मदतीनं झाला होता.
जॉनी डेपशी घटस्फोट घेतल्यानंतर अॅम्बरनं इन्स्टाग्रामवर तिच्या आयुष्यात बाळाचा जन्म झाल्याचा आनंद सगळ्यांसोबत शेअर केला होता. त्यात तिनं सांगितलं होतं की 'चार वर्षांआधी निर्णय घेतला की मला एक बाळ हवं आहे. मला बाळ माझ्याप्रमाणे हवं होतं. त्यातही मला आता या गोष्टीविषयी कळतंय की कोणत्याही व्यक्तीला असा निर्णय घेणं किती क्रांतिकारी आहे.'
तिनं याविषयी पुढे लिहिलं होतं की 'मला आशा आहे की आपण अशा पॉईंटला पोहोचलो आहेत, जिथे मुलांसाठी अंगठी नको असेल (लग्न न करण्याची इच्छा) सामान्य आहे. अॅम्बर हर्डनं 2015 मध्ये जॉनी डेपशी लग्न केलं होतं आणि हे नातं 2017 पर्यंत टिकलं. त्यानंतर 2022 मध्ये त्या दोघांमध्ये कायदेशीर लढाई झाली. त्यांनी सांगितलं की त्या लेक ऊनाघसोबत दिसली होती. अॅम्बरनं आता तिच्या दुसऱ्या मुलांविषयी जास्त माहिती दिली नाही.
हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’चे रेकॉर्ड, पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
हा मुद्दा अॅम्बर हर्डच्या 2018 च्या वॉशिंगटन पोस्टमध्ये आलेल्या एका आर्टिकलमध्ये असं म्हटलं आहे की ती स्वत: कौटुंबिक हिंसाचारचा शिकार झाली होती. या खटल्याच्या वेळी दोघांनी एकमेकांना शारिरीकरित्या, मानसिकरित्या आणि भावनिकरित्या आरोप केले आहेत. जून 2022 मध्ये हा खटला जॉनी डेपनं जिंकला. ज्युरीने अॅम्बर हर्डचं ते आर्टिकल हे बदनामीकारक असल्याचा निर्णय दिला, ज्यामुळे तिला जॉनी डेपला नुकसान भरपाई द्यावी लागली.