अभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा

१४ मे रोजी राखी सावंतला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केलं गेलं. यानंतर राखीचे हॉस्पिटलच्या बेडवरील झोपलेले काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. 

Updated: May 16, 2024, 01:22 PM IST
अभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडटी ड्रामा क्वीन राखी सावंतला नुकतंच हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर अभिनेत्रीला 'सिव्हियर हार्ट प्रॉब्लेम' असल्याची माहिती समोर आली होती. मात्र तिचा एक्स पती रितेश सिंहने अभिनेत्रीच्या गर्भाशयात ट्यूमर असल्याचा खुलासा केला आहे. नुकताच असा धक्कादायक खुलासा तिचा पती रितेश सिंहने केला आहे. 

१४ मे रोजी राखी सावंतला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केलं गेलं. यानंतर राखीचे हॉस्पिटलच्या बेडवरील झोपलेले काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. याआधी अभिनेत्रीला 'हृदयविकार' झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र या बातमीत तथ्य नसल्याने आता तिचा एक्स पती रितेशने मीडियाला स्वत: राखीच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. राखीला गर्भाशयात ट्युमर आढळून आला असून तिला कॅन्सरचं निदन झालं असावा असा डॉक्टरांचा संशय आहे.

नुकतंच रितेशने दिलेल्या मुलाखतीत सांगतिलं की, पोट आणि छातीत दुखू लागल्यानं राखीला रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्या अनेक चाचण्याही करण्यात आल्या आता अभिनेत्रीच्या चाचण्यांच्या रिपोर्ट येणं बाकी आहेत. तिचं पोट आणि छातीत दुखू लागल्याने तिला लगेच रुग्णालयात दाखल केलं गेलं. 

तिच्या अनेक चाचण्या झाल्या आणि आता आम्ही रिपोर्ट येण्याची वाट बघतोय. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे, पण आधी तिला  कॅन्सर आहे की नाही याच्या चाचण्या सुरु आहेत.    रितेशने राखीचे हेल्थ अपडेट शेअर केलं आणि तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितले."

इतकंच नाही तर राखीला पाठिंबा देत रितेश म्हणाला की, "राखीने स्वतःची अशी एक प्रतिमा तयार केली आहे ज्यामुळे लोकं नेहमीच मस्करी करते असं बोलताना दिसत आहेत मात्र, यावेळी राखी कोणाचीही मस्करी करत नाही. सध्या ती हॉस्पिटलमध्ये सिरीयस आहे ."लोक तिला ड्रामा क्वीन म्हणतात, पण यावेळी ती खरंच गंभीर आजाराशी झुंज देत आहे. राखीसाठी प्रार्थना आणि तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा द्याव्या असं आवाहन राखीच्या एक्स पतीने तिच्या चाहत्यांना केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचबरोबर राखीचा भाऊ राकेशने आदिल खान दुर्रानीवर निशाणा साधत म्हटलं की, "आदिल खान दुर्रानी ज्याच्याकडे एक रुपयाही नव्हता, तो आता राखीच्या पैशावर मजा मारतो आहे. त्याने राखीच्या सगळ्या जवळच्या लोकांशी मैत्री करुन त्यांना राखीचा विरोधात उभं केलं आहे. आता सगळी तिच्या मागे हात धूवून मागे लागले आहेत.'' असं वक्तव्य राखीच्या भावाने केलं आहे.