लिलिपुट 'या' मालिकेतून करणार कमबॅक

कोणती आहे ही मालिका 

Updated: Sep 26, 2019, 11:52 AM IST
लिलिपुट 'या' मालिकेतून करणार कमबॅक  title=

मुंबई : लिलिपुट यांच खरं नाव फारच कमी लोकांना माहित असेल. लिलिपुट यांच खरं नाव एम एम फारूकी. या अगोदर शेवटच रोनित रॉयच्या 'अदालत' या लोकप्रिय मालिकेतून लिलिपुट यांच्या छोट्या पडद्यावर वापसी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा लिलिपुट आपल्याला दिसणार आहेत. 

'विद्या' असं नव्या मालिकेचं नाव आहे. ज्यामध्ये मीरा देवस्थले हे कॅरेक्टर लिलिपुट साकारणार आहेत. आपल्या या वापसीला सेकेंड इनिंग म्हणत लिलिपुट खूप उत्साहित आहेत. लिलिपुट आपल्या कॅरेक्टरबद्दल सांगतात की, यामध्ये मी एका प्राचार्याची भूमिका साकारत आहे. हे एक चरित्र अभिनेताचं कॅरेक्टर असून मी त्याला 100 टक्के न्याय देईन असं लिलिपुट म्हणाले. आता प्रेक्षकांच्या हातात आहे की, ते या भूमिकेला किती पसंत करतात. 

लिलिपुट गेल्या 37 वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. थिएटर, सिनेमा आणि टीव्ही या सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ते बोलतात की, थिएटर एक वेगळंच माध्यम आहे. जिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुम्हाला तिथेच मिळते. पण सिनेमा आणि टीव्हीवरील प्रेक्षकांची प्रतिक्रिया कळायला तुम्हाला वेळ लागतो. म्हणून मला थिएटर सर्वाधिक पसंत आहे. 

या 37 वर्षांमध्ये त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या सर्वाधिक जवळचा सिनेमा कोणता? असं विचारलं, तेव्हा त्यांना 1983-84 मधील 'इधर उधर' ही सर्वात जवळची फिल्म असल्याचं त्यांनी सांगितलं. 

जेव्हा मी मुंबईत अभिनय करण्यासाठी आलो तेव्हा माझी ओळख आनंद महेन्द्रूंसोबत झाली. आनंद यांनी मला त्यांच्या डॉक्युमेंट्री फिल्म "जी आय सी'मध्ये काम दिलं. त्यानंतर त्यांनी एक टीव्ही शो करण्याचा निर्णय घेतला आणि दूरदर्शनने देखील त्याला परवानगी दिली. 

पुढे त्यांनी सांगितलं की, दूरदर्शनला तर हा विचार आवडला. पण त्यांच्याकडे कुणी लेखक नव्हता. तेव्हा लिलिपुट यांनी त्यांना कथा ऐकवण्यास सांगितली आणि नंतर ती त्यांच्याच घरी बसून लिहून काढली. अर्ध्या तासात मी त्यांना पहिला एपिसोड लिहून दाखवला आणि तो वाचून ते अगदी खूष झाले. पुढे त्यांनी मला 13 एपिसोड लिहिण्याचं काम दिलं. आणि मग मी 'इधर-उधर'मध्ये लेखकाचं आणि अभिनयाचं काम केलं.