अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नवीन फोटो व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 6, 2024, 12:39 PM IST
अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नवीन फोटो व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला title=

Aishwarya Rai Photos Viral With Abhishek Bachchan​: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या नात्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवांमुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही अनेकदा कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात एकटेच दिसले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा पसरल्या.

दरम्यान, अशातच आता सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचे एकत्र पार्टीमधील फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण घटस्फोटाच्या अफवांमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत.  

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम!

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच चाहत्यांनी त्यांच्या या एकत्र पार्टीमधील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांनी दोघांनाही आनंदाने एकत्र राहण्याचा सल्ला दिला. ऐश्वर्या-अभिषेकचा हा फोटो अनु रंजनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांची आई वृंदा रायसोबत दिसत आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात आयेशा जुल्का, अनु रंजन आणि इतरांसोबत पोज देताना दिसले. 

सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या राय सेल्फी घेताना दिसत आहे. तर ऐश्वर्या आणि अभिषेक काळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहेत. यावेळी ऐश्वर्या रायने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. ज्यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या दिवसापासून घटस्फोटाच्या चर्चा सुरु

दोघांना एकत्र पाहून चाहते देखील प्रचंड खूश झाले आहेत. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या बच्चन आहे. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चाहते देखील नाराज झाले होते. घटस्फोटाच्या अफवांची चर्चा ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाह सोहळ्यापासून सुरु झाली होती.