मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ड्रीम संकल्पना असलेली टॅब योजना तिसऱ्या वर्षीच फोल ठरली. शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब मिळालेले नाहीत.
उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मुंबई महापालिकेनं हरताळ फासलाय. बीएमसीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण देण्याची योजना तिस-याच वर्षी फोल ठरलीय. शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी विद्यार्थ्यांच्या हातात टॅब पोहचलेले नाहीत.
सुमारे १३ हजार टॅब विकत घेण्यासाठी निविदा काढण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे अजून काही काळ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली टॅबची योजना तिस-याच वर्षी पालिकेच्या लालफितीच्या कारभारात अडकल्याचं समोर आलंय. दरम्यान, जीएसटीमुळे खरेदी रखडल्याचा अजब दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केलाय.