संपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट

आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Apr 23, 2017, 01:07 PM IST

मुंबई : आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.

28 रनवर आऊट होणाऱ्या चीनला 390 रन्सने पराभव स्विकारावा लागला. हा सामना थायलँडमधील चियांग माईच्या जिमखाना क्लबमध्ये खेळला गेला. या टूर्नामेंटमध्ये थायलँड शिवाय भूटान, बहरीन, कुवैत आणि कतार या संघांचा देखील सहभाग होता.

चीनचे सात बॅट्समन 0 रनवर आऊट झाले. तीन बॅट्समनने 3, 6, 6* रन केले. यामध्ये 13 रन एक्स्ट्रा मिळाले. शाहबाज रशीदने हॅट्रिक घेतली. चीनचे बॉलर देखील फेल ठरले. सऊदी अरबने चीनसमोर 418 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.