मुंबई : मुंबईत बांधकामाला मंजुरी देण्याचे अधिकार आता परवानाधारक खाजगी वास्तुविशारदांना आणि सर्वेक्षकांना मिळणार आहेत. यापुढे मुंबई महापालिका हद्दीत बांधकाम परवानगीसाठी इमारत प्रस्ताव विभागाकडे जाण्याची गरज भासणार नाही.
निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक बांधकामांच्या मंजुरीचे अधिकार परवानाधारक वास्तुविशारदांना मिळतील. राज्य सरकार त्यासाठी एमआरटीपी कायद्यात सुधारणा करणार आहे. बांधकाम क्षेत्रात 'इज ऑफ डुईंग बिझनेस' राबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. बांधकामाच्या मंजुरीसाठी व्यावसायिकांना बऱ्याच कटकटींना सामोरं जावं लागतं. त्या कमी करण्यासाठी आणि लहान बांधकामांना लवकर मंजुरी मिळावी यासाठी कायद्यात बदलाचा प्रस्ताव ठेवण्यात आलं आहे.