नवी दिल्ली : चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
चीनने एक आदेश जारी केला आहे की, शिनजांगमध्ये आता कोणीही 'असामान्य' दाढी नाही ठेवणार आणि चीनमधील सार्वजनिक ठिकाणी महिलांनी बुरखा घालण्यासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक पद्धतीने लग्न न करण्याचा नियमही जाहीर करण्यात आला आहे. हलाल शब्दाचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याआधी चीनने येथे रमजान दरम्यान लोकांना रोजा ठेवण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
मागील काही वर्षापासून शिनजांग राज्य धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे हिंसेत वावरत आहे. यामध्ये शेकडो लोकं मारले गेले आहेत. या राज्यात उइगर मुस्लीम समाजाची लोकं अधिक आहेत. चीन येथील हिंसेला आयसीस आणि उग्रवाद्यांना दोष देतो. शिनजांग राज्य सरकारने बुधवारी अनेक नवे कायदे केले. जे १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.