VIDEO: महिलेने रस्त्यात दिला मुलाला जन्म, नंतर उचलून घरी घेऊन गेली...

 भारतात रेल्वे, टॅक्सी, रिक्षा येथे मुलाला जन्म दिलेल्या आपण बातम्या ऐकल्या असतील पण भर रस्त्यात महिला चालत असताना प्रसुत झाल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. 

Updated: Sep 5, 2017, 06:19 PM IST
VIDEO: महिलेने रस्त्यात दिला मुलाला जन्म, नंतर उचलून घरी घेऊन गेली... title=

पेइचिंग :  भारतात रेल्वे, टॅक्सी, रिक्षा येथे मुलाला जन्म दिलेल्या आपण बातम्या ऐकल्या असतील पण भर रस्त्यात महिला चालत असताना प्रसुत झाल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. 

महिलेने रस्त्यावर बाळाला दिलेल्या जन्माचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की महिला रस्त्यावर उभी असताना तिची डिलीवरी झाली आणि थोड्याच वेळात ती आपल्या बाळाला उचलून घऱाकडे निघाली. 

फेसबूकवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर काही तासाच याला दीड लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला.

 

हा प्रकार चीनच्या ग्वांगदोंग शहरातील आहे. ही महिला बाजारात सामना खरेदी करण्यासाठी आली असता महिलेला लेबर पेन सुरू झाल्या. त्यानंतर ती महिला रस्त्यावरच उभी राहली आणि पाहता पाहता तिने बाळाला जन्म दिला. 

नवजात बाळाला पाहून आसपासच्या लोकांनी अँब्युलन्स बोलवली. थोड्या वेळा महिलेची प्रकृती सुधारील आणि आपल्या बाळासह सामान घेऊन पायी आपल्या घरी चालत गेली.