कोरोनाचा धोका कायम, WHOकडून नव्या टप्प्याचा इशारा

मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण आढळत असून ही मोठी चिंताजनक बाब आहे.

Updated: Jun 21, 2020, 06:48 PM IST
कोरोनाचा धोका कायम, WHOकडून नव्या टप्प्याचा इशारा title=
संग्रहित फोटो

जिनेव्हा : कोरोना व्हायरसचा धोका कमी झाला, असं कोणाला वाटत असल्यास हा चुकीचा समज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संसर्गाच्या 'नवीन आणि धोकादायक' अवस्थेचा इशारा दिला आहे.

WHOचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus यांनी शुक्रवारी सांगितलं की, जग कोरोना संसर्गाच्या नवीन आणि धोकादायक टप्प्यात आहे. अनेक लोक घरांत बंद राहून कंटाळले आहेत, परंतु परिस्थिती अद्यापही सुधारली नाही. कोरोना व्हायरस अजूनही वेगात पसरत आहे. अमेरिकेसह दक्षिण आणि पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळत असून ही मोठी चिंताजनक बाब आहे.

भारतासह जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. अमेरिका आणि ब्राझिल या देशांमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्गाला तितकंस महत्त्व न देता, कडक उपाययोजना करण्याबाबत विरोध केला होता. आज या दोन्ही देशांची स्थिती सर्वांसमोर आहे. ब्राझिलमध्ये कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या 10 लाखांवर पोहचली आहे.

भारताविरुद्ध युद्धाचा धोका चीन पत्करणार नाही, हे आहे कारण

 

कोरोना काळातच, कालांतराने अनेक देशांनी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन उठवण्यात आलं असलं तरी, जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन उठवण्याबाबतीत केलेली घाई धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे.

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी होत असताना, आता पुन्हा चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे.

चीनच्या मासळी आणि मांस बाजारात आढळला कोरोना व्हायरस

आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 4,58,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात 8.6 मिलियन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारत-चीन वादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य