ब्रुसेल्स: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की युरोप आणि मध्य आशियामध्ये कोरोना व्हायरसची (Corona virus) प्रकरणे सातत्याने वाढत असली तरी 1 फेब्रुवारीपूर्वी या प्रदेशांमध्ये सुमारे 5 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये नवीन कोरोना प्रकरणांमध्ये (Corona cases) 55 टक्के वाढ झाली आहे, तर युरोप आणि मध्य आशियामध्ये जागतिक प्रकरणांपैकी 59 टक्के वाढ होती. तर मृत्यूची संख्या 48 टक्के आहे.
डब्ल्यूएचओचे युरोपियन प्रादेशिक संचालक डॉ. हॅन्स क्लुगे यांनी लोकांचे निष्काळजीपणा, मास्क न लावणे आणि लस न घेणे (corona vaccine) हे कारण असल्याचे सांगितले. याशिवाय यामुळेच, हिवाळ्याच्या हंगामात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं देखील क्लुगे यांनी म्हटलं. याशिवाय बंद ठिकाणी लोकांची जमवाजमव आणि डेल्टा वेरिएंट्समुळेही नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
कमी लसीकरण हे देखील एक कारण
डब्ल्यूएचओच्या अहवालात असे नमूद केले आहे की, सुमारे एक अब्ज लसीचे डोस दिले गेले आहेत, परंतु या प्रदेशातील केवळ 47 टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु क्लुगे म्हणाले की, जर युरोप आणि मध्य आशियातील 95 टक्के लोकांनी मास्क घातले आणि नियमांचे पालन केले तर फेब्रुवारी 2022 पूर्वी मृतांचा आकडा कमी होऊ शकतो.
अर्थात, युरोप एक खंड म्हणून खूप एकमेकांशी जोडलेला आहे, कदाचित इतर प्रदेशांच्या तुलनेत त्यामुळे येथे संसर्ग होण्याची शक्यता वाढत असल्याचं, डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन टीमच्या डॉ. कॅथरीन स्मॉलवुड म्हणाले.
स्मॉलवुड म्हणाले, सध्या प्रदेशात अनेक गर्भवती महिला कोरोना विषाणूने रुग्णालयात दाखल आहेत. कोविड-19 लसीकरणाचे फायदे आणि जोखीम त्यांना समजावून सांगण्यासाठी तज्ञांनी आणखी काही करणे आवश्यक आहे. डेल्टा प्रकाराचा प्रादुर्भाव या प्रदेशात सर्वाधिक आहे.
WHO च्या मते, डेल्टा कोविड सबवेरियंट AY.4.2 ची 26 हजार हून अधिक प्रकरणे 42 देशांतून नोंदवली गेली आहेत, जी मूळ डेल्टाच्या तुलनेत 15 टक्के जास्त प्राणघातक म्हणून ओळखली जातात.