Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Weird Marriage Tradition : बापरे ही परंपरा आहे की शिक्षा? लेकीची पाठवणी करताना वडील तिच्या छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

नेहा चौधरी | Updated: Dec 11, 2023, 09:37 PM IST
Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते? title=
Weird Tradition father spit on bride breast in wedding and bride head shave Where is the tradition observed

Tribal Tradition :  सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. या किळसवाणी प्रथेसोबत त्या वधूचं मुंडनदेखील केलं जातं. कुठेही आहे ही प्रथा आणि का आजही प्रथा पाळली जाते जाणून घेऊयात. ( Weird Tradition father spit on bride breast in wedding and bride head shave Where is the tradition observed)

वडील डोक्यावर थुंकतात

भारतात मुलीची पाठवणी करताना आई-वडिलांची गळाभेट तिला अनेक आशिर्वाद देत सासरी पाठवतात. मात्र या जमातीत लग्नानंतरच्या निरोपालाही स्वतःचे वेगळे महत्त्व असून विचित्र प्रथा पाळली जाते. या जमातीमध्ये लग्नाच्यावेळी जेव्हा वधूला निरोप देताना जे दृश्य दिसते, ते पाहून संताप होतो. लेकीला निरोप देताना मुलीचे वडील तिच्या छातीवर आणि डोक्यावर थुंकतात. या जमातीच्या विवाहांमध्ये निरोप देताना केला जाणारा हा एक विशेष विधी मानला जातो. जो प्रत्येक वडिलांनी करायचा असतो.

या प्रथेमागील कारण का?

हा किळसवाणा प्रकार आजही का पाळला जातो. तर आम्ही सांगतो तुम्हाला मीडिया रिपोर्टनुसार या जमातीत लेकीला निरोप देताना वडील तिच्या छाती आणि डोक्यावर थुंकणं वरदान मानलं जातं. जर वडिलांनी डोक्यावर थुंकले नाही तर याचा अर्थ त्याने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला नाही, असा समज आहे. त्यामुळे आपल्या मुलींच्या निरोपाच्या वेळी, सर्व वडील निश्चितपणे त्यांच्या डोक्यावर थुंकतात आणि सुखी संसाराची आशिर्वाद देतात. दरम्यान या जमातीत सर्व विधी व्यवस्थित पार पडतात. फक्त पाठवणीची ही एकच प्रथा खूप किळसवाणी प्रथा पाळली जाते. 

वधूचं मुंडन !

या जमातीत वधूचं मुंडन करण्यात येतं. त्यानंतर त्याला कुटुंबातील वडीलधारी मंडळी बसलेल्या ठिकाणी घेऊन जातात. तिथे जाऊन मुलगी वडिलांसमोर गुडघ्यावर बसते आणि त्यांच्या आशीर्वाद मागते. यावेळी वडील आणि कुटुंबातील इतर वडीलधारी मंडळी मुलीच्या छातीवर थुंकतात आणि तिच्या कपाळावरही थुंकतात. आशीर्वादासाठी वधूचं मुंडन केलं जातं. 

हेसुद्धा वाचा - Weird Tradition : भारतातील 'या' गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो...

नवरदेव देतो हुंडा!

या जमातीच्या परंपरेत लग्नाच्या वेळी वधूचं कुटुंब हुंडा देत नाही, तर नवरदेवाचं कुटुंब हुंडा देण्याची प्रथा आहे. हा हुंडा वधू आणि तिच्या कुटुंबाने स्वीकारला, तेव्हा हा विवाह अंतिम समजला जातो आणि पुढील विधी होतात.

कुठे पाळली जाते ही विचित्र प्रथा!

मीडियम वेबसाइटच्या अहवालानुसार, मासाई जमातीचे लोक उत्तर-मध्य आणि दक्षिण केनियासह उत्तर टांझानियामध्ये वास्तव करतात. ही आफ्रिकेतील जुनी आणि प्रसिद्ध जमात मानली जाते. या जमातीचे लोक भयंकर योद्धे असून या जमातील प्रथा विचित्र आहे. मात्र जगाला या त्यांच्या विचित्र वाटणाऱ्या लग्नाशी संबंधित अनोख्या परंपरा इथे आजही पाळल्या जातात.