मुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात

Viral News : शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची अफवा अनेक महिन्यांपासून शाळेत वाऱ्यासारखी पसरली होती. या गोष्टीची भनक जेव्हा त्या मुलाच्या आईला कळली तेव्हा तिने...  

नेहा चौधरी | Updated: Dec 17, 2023, 10:38 PM IST
मुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात  title=
The boy starts an affair with the school teacher the mother catches him red handed with the help of technology

Viral Trending News : मुलांचा पहिला गुरु आई वडील आणि त्यानंतर त्याचे शिक्षक असतात. गुरुची जागा ही जगात सर्वात उच्च स्थानी असते. गुरु आणि विद्यार्थ्यांचं नातं पवित्र मानलं जातं. पण एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे या नात्याला काळिमा फासला आहे. एका मुलाचं आपल्या शिक्षिकेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्या मुलाच्या आईला होता. तिने टेक्नोलॉजीच्या मदतीने तिने दोघांना रंगेहात पकडलं. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. (The boy starts an affair with the school teacher the mother catches him red handed with the help of technology)

नात्याला काळिमा!

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्या मुलाचे त्याच्या साउथ मेक्लेनबर्ग हायस्कूलमधील 26 वर्षीय शिक्षिका गॅब्रिएला कार्टाया-न्यूफेल्डसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या अनैतिक संबंधांच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून शाळेत पसरली होती. या गोष्टी संशय त्या मुलाच्या आईला होता. ती शिक्षिका त्या शाळेत मुलांना विज्ञान शिकवायची. मुलाच्या कारनामाचा छडा लावण्यासाठी त्या मुलाच्या आईने मुलाच्या फोनमध्ये ट्रॅकिंग अॅप इन्स्टॉल केला. एक दिवस तिला कळलं की, तिचा मुलगा रग्बी प्रॅक्टिसला गेला नाही. तिला संशय आला, तिने अॅपच्या मदतीने मुलाच्या छडा लावायचं ठरवलं. त्या अॅपने त्या मुलाचं लोकेशन स्थानिक उद्यानाजवळ होतं. ती तिथे पोहोचली असताना शिक्षिका आणि तिचा मुलगा एका कारमध्ये होते. त्या महिलेने जे पाहिलं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शिक्षिका आणि तिचा मुलगा कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते. धक्कादायक म्हणजे घटनेच्या वेळी ती कार त्या महिलेच्या आईच्या घराजवळ उभी होती. 

त्या दोघांना रंगहात पकडल्यानंतर शिक्षिकेच्या गाडीचे आणि लायसन्स प्लेटचे अनेक फोटो त्या महिलेने काढले. त्यानंतर तिन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शिक्षिकेला ताब्यात घेतलंय. तरदुसरीकडे अफवांमुळे शाळा प्रशासनाने दोघांची चौकशी करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत लैंगिक कृत्य केल्याच्या पाच प्रकरणात आता शिक्षिकेवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

सुरुवातीला शिक्षिकेच्या गेल्या महिन्याच्या अखेरीस मेक्लेनबर्ग काउंटी तुरुंगात आले. त्यानंतर त्या शिक्षिकेची जामिनावर सुटका झाली. ही धक्कादायक घटना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील आहे. दरम्यान महिलेने वापरलेल्या अॅपचे नाव Life 360 ​​असून मार्क झुकरबर्गची बहीण रँडी ही तिच्या बोर्ड सदस्यांपैकी एक आहे. जे पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवतात, त्यांच्यामध्ये हा अॅप लोकप्रिय आहे. 

हे अॅप मुलांच्या सुरक्षेसाठी लावण्यात येतं. ज्यानुसार मुलं जेव्हा वेगवान वाहनाच्या आत असेल किंवा पूर्वनिश्चित ठिकाणाहून कोठेतरी गेले असेल तर हा डिव्हाइस पालकांना मुलांची माहिती देतो. हा अॅप सुमारे 50 दशलक्ष ग्राहक आहेत. या अॅपच्या माध्यमातून या वर्षी $300 दशलक्ष कमावण्याची अपेक्षा कंपनीला आहे.

मात्र, डेटा कलेक्शनच्या आरोपासोबतच अॅपवर टीका होताना दिसत आहे. मानवी तस्करी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अॅप वापरून पीडितांचा माग काढण्यात मदत मिळते. याशिवाय ज्या मुलांचे पालक हे अॅप वापरतात ते त्यांचं मत सोशल मीडियावर शेअर करत आहेत.