अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो

अंतराळात हरवलेल टॉमेटो अखेर 8 महिन्यानंतर सापडला आहे. या टोमॅटो कसा दिसतो याचे फोटो नासाने शेअर केले आहेत. 

Updated: Dec 17, 2023, 06:09 PM IST
अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो title=

NASA releases footage of tomatoes lost in space : सध्या एक टोमॅटो चांगलाच चर्चेत आहे. हा टोमॅटो साधासुधा नसून अंतराळात पिकवलेला टोमॅटो आहे. अंतराळात पिकवलेला हा टोमॅटो अंतराळातच हरवला होता. अंतराळात हरवलेला हा टोमॅटो तब्बल 8 महिन्यानंतर सापडला आहे.  8 महिन्यानंतर सापडलेला हा टोमॅटोची अवस्था कशी झालेय याचा फोटोच नासाने शेअर केला आहे. 

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही एक प्रकारची प्रयोग शाळाच आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. या संशोधनादरम्यान International Space Station टोमॅटो पिकवण्यात आला होता. जो आठ महिन्यांपासून गायब होता. हा टोमॅटो आता सापडला आहे. 

2022 मध्ये अंतराळवीर फ्रँक रुबिओ यांनी प्रयोग म्हणून  International Space Station वरील प्रयोग शाळेत  टोमॅटोची लागवड केली होता. अंतराळात शेती करणे शक्य आहे याचे संशोधन करण्यासाठीच प्रयोग शाळेतच या टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. 

29 मार्च 2023 रोजी हे झाडाचे टोमॅटो तो़डून सर्व अंतराळवीरांना सॅम्पल म्हणून देण्यात आले होते. एका प्लास्टिकच्या पिशवीत भरुन हे टोमॅटो देण्यात आले होते  फ्रँक रुबिओ यांना देण्यात आलेल्या झिप लॉकबॅगमध्ये देखील दोन टोमॅटो होते. मात्र,  फ्रँक रुबिओ यांंच्याकडून हे टोमॅटो हरवले.  फ्रँक रुबिओ यांनी हे टोमॅटो खाल्ल्याच्या गमतीशीर आरोप देखील इतर अंतराळवीरांनी त्यांच्यावर केला. 

अखेर टोमॅटो सापडले

फ्रँक रुबिओ यांंच्याकडून हरवलेले दोन टोमॅटो अखेर सापडले आहेत.  13 सप्टेंबर रोजी सर्वप्रथम  International Space Station  टोमॅटो हरवल्याची माहिती चर्चेत आली. एका Live चर्चासत्रारम्यान  फ्रँक रुबिओ यांनी हरवलेल्या टोमॅटोचा मी शोध घेत घेण्यात बऱ्याचवेळ घालवल्याचे सांगितले. International Space Station हे सहा बेडरुमच्या घराइतके मोठे आहे. अंतराळात कोणत्याही प्रकारचे गुरुत्वाकर्षण नाही. यामुळे International Space Station वर कार्यरत असलेले अंतराळवीर देखील हवेत तरंगत असतात.  सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुले इतर वस्ती देखील हवेत कुठेही तरंगत राहतात.   फ्रँक रुबिओ यांना देण्यात आलेलीटोमॅटोची प्लास्टिकची झिप लॉकबॅग देखील अशीच तरंगत राहून गायब झाली.

टोमॅटोची काय अवस्था झाली?

अंतराळात हरवले टोमॅटो 8 महिन्यानंतर सापडले आहेत. प्लास्टिकची झिप लॉकबॅगमध्ये असलेल्या टोमॅटोमधील आद्रता निघून गेली आहे. टोमॅटो पूर्णपणे सुकला आहे. भविष्यात अंतराळातील  वातावरणात पिकांची लागवज करणे शक्य होवू शकते यासाठी हे संशोधन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.