Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग... ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

पाहा शक्तीशाली पुतीन कोणाला घाबरतायत...

Updated: Mar 24, 2022, 10:39 AM IST
Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग... ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित  title=
व्लादिमीर पुतीन

मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भलत्याच गोष्टीची धास् लागली आहे. अण्वस्त्र हल्ल्यांच्या भीतीनं सध्या पुतीन यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. त्यांच्या मनात असणाऱी भीती आता इतकी वाढली आहे की, खासगी सेवेत असणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तातडीनं निलंबित केलं आहे. (Russia president Vladimir putin)

कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी विषप्रयोग केला जाऊ शकतो, या भीतीनं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

काही प्रसिद्ध माध्यमांच्या वृत्तांनुसार पुतीन यांनी आचारी, सचिव, धोबी, सुरक्षारक्षक या सर्वांना कामावरून निलंबित केलं आहे. मागील 26 दिवसांपासून रशिया युक्रेनवर सातत्यान हल्ले करत आहे.

रशियाच्या हल्ल्यांत बहुतांश युक्रेन उध्वस्त झालेलं असलं तरीही युक्रेनची राजधानी किव्ह मात्र झेलेंस्की सरकारच्या नियंत्रणात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार क्रेमलिनमधील काही लोक सत्तापालट करत पुतीन यांना सत्तेतून बेदखल करण्यास भाग पाडू शकतात.

सत्तेतून बेदखल करणं यावरच इथं काहींचा भर असेल. यासाठी मग त्यांच्या हत्येचाही कट रचला जाऊ शकतो. रशियातील काही वरिष्ठ राजकीय नेतेमंडळींनी जाहीरपणे पुतीन यांच्या खास मंडळींना त्यांच्या हत्येसाठी प्रवृत्त केल्याचं म्हटलं आहे.

फ्रेंच गुप्तचर यंत्रेनं केलेल्या दाव्यानुसार पूतीन यांच्या हत्येचा कट रचला गेल्यास त्यासाठी विषप्रयोगाचा मार्ग निवडला जाऊ शकतो. रशियन सैन्याला आपल्या शत्रूविरोधात विषप्रयोग करण्यासाठी ओळखलं जातं. हाच प्रयोग क्रेमलिनमधूनही केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.