मुंबई : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो. येथे कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट, ट्रॅव्हल इत्यादी संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेन्ट पाहायला मिळते. ऐवढेच नाही तर सोशल मीडिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं, ज्याचा वापर आपल्या भविष्यात होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो आपल्यासर्वांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. हा व्हिडीओ एका व्यक्तीचा आहे, जो पावसामुळे येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे एका भयंकर अपघाताला बळी पडतो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्याकडेला उभा असतो, तो खाली वाकून आपल्या बुटाची लेस बांधत असतो. तेवढ्यात अचानक जोरदार वारा येतो, ज्यामुळे त्याच्या मागे असेला गेट हवेने जोरात ढकलला जातो. जो या व्यक्तीला मागून ठोकतो.
हा गेट इतका जोरात मागून येतो की, हा व्यक्ती गोलांटीउडी मारुन खाली पडतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून अंदाजा लावू शकता की, या व्यक्तीला किती जोरात लागलं असावं.
नशीबाने या व्यक्तीचा जीव वाचला आहे, परंतु त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. हे मात्र नक्की.
हा व्हिडीओ नक्की कुठला आहे? हे समोर आलेलं नाही परंतु हा व्हिडीओ Figen नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
— Figen (@TheFigen) June 29, 2022
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. एका इंटरनेट वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, 'अरे देवा हे धोकादायक असू शकते'.
सध्या पावसाचा सिझन सुरु आहे, त्यामुळे तुम्ही देखील रस्त्याच्या कडेला कुठेही उभे राहाताना काळजी घ्या आणि सतर्क राहून रस्त्यावरुन चाला.