आता हॉटेलमध्ये टेबल बुक करणार 'गुगल'

तुम्ही सांगाल ते काम आता गुगल करणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी टेबल बुक करणार आहे. टॅक्सी बुक करणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे... हे कसं शक्य होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. 

आता हॉटेलमध्ये टेबल बुक करणार 'गुगल' title=

मुंबई : तुम्ही सांगाल ते काम आता गुगल करणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी टेबल बुक करणार आहे. टॅक्सी बुक करणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे... हे कसं शक्य होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. 

फक्त म्हणा गुगल... 

काही अडलं की तुमच्या मदतीला येणाऱ्या गुगलनं आता आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.  तुमच्या मदतीसाठी सज्ज असलेलं गुगल असिस्टंट आता तुमच्यासाठी बरंच काही करु शकणार आहे. सद्यस्थितीत गुगल असिस्टंट फक्त तुमच्या आज्ञांचं पालन करतं पण पुढच्या काही महिन्यांत गुगल असिस्टंट तुमच्याशी संवाद साधू शकणार आहे. तुमच्यासाठी सलूनमध्ये अपोईण्टमेंट बुक करु शकणार आहे. एखाद्या रेस्टोरंटमध्ये तुमच्यासाठी टेबल बुक करु शकणार आहे. तुमच्यासाठी टॅक्सी बुक करणार आहे. कॅलिफॉर्नियातल्या गुगलच्या मुख्यालयात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी याचा डेमो दाखवला आहे, 

गुगलपाठोपाठ फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन या कंपन्याही व्हॉईस असिस्टंट आणण्याच्या तयारीत आहेत. तंत्रज्ञानाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं हे पुढचं पाऊल आहे.  गुगल असिस्टंटच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या पिझ्झा, कॉफी आणि बरंच काही मागवू शकणार आहात. त्यासाठी कुठला पिझ्झा हवा, कुठल्या हॉटेलमधून हवा, हा सगळा संवाद तुमच्याशी गुगलच साधणार आहे आणि तुमच्यापर्यंत पिझ्झा पोहोचवणारही आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त हे गुगल एवढंच म्हणावं लागणार आहे.