मुंबई : चीनमध्ये जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतूकीसाठी लवकरच खुला होणार आहे. हाँगकाँग आणि मकाऊ या दोन बेट वजा राज्यांना जोडणाऱ्या तब्बल ५५ किलोमीटरचा सागरी सेतू बांधून तयार झाला आहे. त्यासाठी १ लाख ३३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
चायना मॉर्निग या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार पुलाचं आयुष्य १२० वर्ष असून त्यासाठी १४ हजार कामगारांनी कष्ट घेतले आहेत. पुलाचा पाया मजबूत राहावा यासाठी समुद्राच्या तळाशी खोदकाम करण्यात आले आहेत. शिवाय पूल मजबूत व्हावा यासाठी ६० आयफेले टॉवर उभारायला जितकं पोलाद लागेल तितकं पोलाद वापरण्यात आले आहेत. या पुलावरून रोज ४० हजार वाहनं प्रवास करतील असा अंदाज आहे. पुलामुळे सध्या झुहाई आणि हाँगकाँग प्रांतातलं तीन तासांचं अंतर आता फक्त ३० मिनिटात पार करता येणार आहे.