अमेरिकेत कोरोनाचे थैमान; सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २००० लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 15 लाखांहून अधिक आहे. 

Updated: Apr 9, 2020, 08:42 AM IST
अमेरिकेत कोरोनाचे थैमान;  सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २००० लोकांचा मृत्यू title=

वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वेगाने फैलाव होत असलेल्या अमेरिकेत सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे जवळपास २००० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा आता १४,६९५ वर जाऊन पोहोचला आहे.

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, ११७ रुग्णांना दिला डिस्चार्ज

मंगळवारी कोरोनामुळे १९३९ अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडले होते. तर बुधवारी हा आकडा १९७३ वर जाऊन पोहोचला. अमेरिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमध्ये बुधवारी ७७९ लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एकाच दिवसात इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू कुओमो यांनी म्हटले. 

कोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प

यापूर्वी ९\११ च्या दहशतवादी हल्ल्यात २,७५३ अमेरिकन नागरिक मारले गेले होते. त्यानंतर पहिल्यांदाच न्यूयॉर्कमध्ये इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याचे कुओमो यांनी सांगितले. एकट्या न्यूयॉर्क शहरात कोरोनाने आतापर्यंत ६२६८ लोकांचा बळी घेतला आहे.  तर जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 15 लाखांहून अधिक आहे. यापैकी ८८, ४१५ लोकांचा मृत्यू झाला आहे.  इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांमध्ये दररोज कोरोनामुळे लोक शेकड्याने बळी पडत आहेत.