वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत औषध पुरवठा कमी पडू लागला आहे. अमेरिकेने भारताकडे हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मागणी केली होती. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना भारताने अमेरिकेला मदत केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत. संकटकाळात भारताने ही मदत केल्याने आपण ही मदत कधीही विसरु शकत नाही, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या मागणीनंतर भारतानं हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मदत केली आहे. यापार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. अशा असाधारण परिस्थितीत भारताने मदत केली आहे. ही मदत कधीही विसरु शकणार नाही. यासाठी भारत आणि नरेंद्र मोदी यांचे आभार असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.
Extraordinary times require even closer cooperation between friends. Thank you India and the Indian people for the decision on HCQ. Will not be forgotten! Thank you Prime Minister @NarendraModi for your strong leadership in helping not just India, but humanity, in this fight!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 8, 2020
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी बंद करु, अशी धमकी दिली होती. कोरोनासारख्या जागतिक साथीचा धोका वेळीच ओळखण्यात WHO ला अपयश आले. एवढेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटना चीनकडे अधिक लक्ष पुरवत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्याप्रमाणावर निधी पुरवला जातो. WHO चे चीनकेंद्री धोरण आणि सुरुवातीच्या काळात कोरोना व्हायरससंदर्भात मी घेतलेल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय समूदायाने अयोग्य ठरवले होते.
त्याआधी कोरोनामुळे संकटात आलेल्या अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच भारताकडे मदत मागितली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने मदत न केल्यास धमकी देखील दिली होती. भारताने जर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या पुरविल्या नाहीतर त्यांच्यावर कारवाई करु. या वक्तव्यानंतर भारतात देखील वाद तयार झाला. विरोधीपक्ष सरकारला अमेरिकेच्या दबावात काम करु नका असे म्हणू लागला होता. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेला मदत करण्यापेक्षा प्रथम आपल्या देशावर लक्ष केंद्रीत करावे. आधी देश मग बाकीचे, असे राहुल गांधी म्हटले होते.